किकवी गावच्या हद्दीतून मोटरसायकल चोरीस! अज्ञात चोरट्या विरुद्ध राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
सारोळे : पुणे सातारा महामार्गावरील भोर तालुक्यातील किकवी गावच्या हद्दीतुन मोटर सायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. १२/७/२४ रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान किकवी ता.भोर जि. पुणे गावच्या हद्दीतील पुणे सातारा सेवा रस्त्यावरील शुभम निगडे यांच्या गुरांच्या गोठ्यासमोर पार्किंग केलेली होंडा कंपनीची फॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक एम एच १२ एल बी ९७८१ही गाडी अज्ञात चोरट्याने सकाळी चोरून नेली आहे.
३०००० रुपये किमतीची होंडा कंपनीची फॅशन प्रो असून तिचा रंग लाल आणि काळे पट्ट्याचा आहे. याबाबत शुभम राजेंद्र निगडे वय २६ वर्ष यांनी राजगड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे.
याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लडकत करीत आहेत.