जि.प. प्रा. शाळा किकवीत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न


संपादक मंगेश पवार

कार्यकारी संपादक सागर खुडे

दि. 17 सारोळे:- भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, किकवी येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास गावातील विविध सामाजिक संस्था, पालकवर्ग, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन किकवी गावचे युवा सरपंच नवनाथजी कदम आणि उपसरपंच भास्करराव सपकाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

इयत्ता पहिलीतील नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प, खाऊ वाटप आणि तळहाताच्या ठशांद्वारे करण्यात आले. पुष्पवृष्टी आणि औक्षणाने स्वागत सोहळा अधिकच मंगलमय झाला. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, अंकलिपी, तसेच दप्तर, वह्या, चित्रकला वही, रंगपेटी, कंपास, पेन्सिल, पेन, पॅड, कव्हर रोल, पाण्याची बाटली आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

ADVERTISEMENT

 

गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप ग्रामविकास अधिकारी  गेजगे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शालेय गीतांवर सादर केलेल्या नृत्यांनी वातावरणात रंगत आणली.

 

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून ग्रामस्तरावर शाळेच्या उपक्रमांना मिळणारा सकारात्मक प्रतिसाद प्रेरणादायी ठरतो आहे. इंग्रजी माध्यमातील अनेक विद्यार्थ्यांनीही शाळेत प्रवेश घेतल्याने जि.प. प्रा. शाळा किकवी या शाळेचे भोर तालुक्याच्या पूर्व भागात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

प्रवेशोत्सवाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शशिकांत गुरव यांनी केले. सुत्रसंचालन घोगरे यांनी तर आभार प्रदर्शन ननावरे यांनी केले.

 

या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी मनोजकुमार बामणे, विस्तार अधिकारी शेख मॅडम आणि केंद्रप्रमुख विजयकुमार थोपटे यांची विशेष उपस्थिती लाभली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!