स्पर्धा परीक्षेतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन – श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, भोर यांच्यातर्फे सन्मान.
दि. 17 भोर (पुण्यभूमी प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, भोर’ यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने सेवाकेंद्रात श्री स्वामी समर्थ यांच्या आरती या गुणवंत विद्यार्थीचे हस्ते करण्यात आली.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी संतोष कदम यांनी माहिती देताना सांगितले की, “सेवा केंद्रामार्फत बालसंस्कार उपक्रमांतर्गत वर्षभरात विविध शैक्षणिक व प्रेरणादायी कार्यक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या यशस्वी विद्यार्थ्यांना श्री स्वामी समर्थांच्या सान्निध्यात सत्कार व आरतीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.”
सन्मानित विद्यार्थी आणि त्यांची यशोगाथा:
1. सुजल सुरेश सणस (कारी) – भारतीय सैन्य दलात यशस्वी निवड
2. पै. आदित्य सुनिल धुमाळ (येवली) – भारतीय सैन्य दलात निवड
3. निलेश सुरेश महाडिक – वनवासी कल्याण आश्रम, पोलीस भरतीत चालक व कारागृह पोलीस पदावर निवड
4. सौ. आरती ताई सचिन भालघरे (सिंद) – मुंबई पोलीस दलात निवड
5. अमित साठे (भोर) – प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश, राज्यस्तरावर 114 न्यायाधीशांमध्ये 36 वा क्रमांक
6. अक्षदा भिमाशंकर सुतार (मुळ गाव अक्कलकोट – सध्या पांडे भोर) – मुंबई पोलीस भरतीत यश
7. तेजस गणेश गोळे (नांद खालचे) – भारतीय सैन्य दलात निवड
8. कु. नेहा विठ्ठल चिकणे (पानव्हळ) – MPSC सहाय्यक गटविकास अधिकारी (A.BDO) पदावर निवड
9. सौ. अश्विनी शुभम भोमे (शिंद) – स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पुणे
10. कु. हर्ष सुरेंद्र घाटे (नाटंबी) – UPSC मार्फत घेतलेल्या CDS परीक्षेत उत्तीर्ण, लेफ्टनंट (Class 1) पदावर निवड
या गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सेवा केंद्रात येऊन श्री स्वामी समर्थ आरती केली.
अन्य गौरवप्राप्त विद्यार्थी, जे उपस्थित राहू शकले नाहीत:
1. सौ. मोहीनी अमित नांगरे (खानापूर) – महसूल सहायक पदावर निवड
2. सचिन मरगजे (कान्हवडी) – पोलीस निरीक्षक पदी निवड
या दोघांनी वेळ मिळताच श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी येण्यार असल्याचे संतोष कदम यांनी सांगितले.
. उपक्रमाचा हेतू:
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे. ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील कठोर परिश्रम व योग्य मार्गदर्शनाच्या आधारे मोठे यश मिळवू शकतात, हे या उपक्रमाचा उद्देश होता
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, पुढील काळातही असे उपक्रम प्रेरणादायी ठरतील.