भोर-महाड रस्ता पुढील तीन महिने बंद.


पुण्यभूमी प्रतिनिधी | भोर

दि. 18 जून भोर : पावसाळा सुरू होताच भोर-महाड मार्गावरील दरड कोसळणे, रस्ता खचणे आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भोर-महाड घाटमार्ग पुढील तीन महिन्यांसाठी अवजड व मध्यम वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

 

१८ जूनपासून या रस्त्यावर दुरुस्ती, मजबुतीकरण आणि संरक्षक भिंतींचे काम सुरू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संयुक्त नियोजनानुसार हे काम राबवण्यात येणार आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मर्यादित स्वरूपात प्रवेश दिला जाणार आहे.

ADVERTISEMENT

 

महाडकडून भोरकडे येताना घाटात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. भोर महाड रस्त्याचे कामही चालू आहे. मागील काही दिवसांत वाहनांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले असून, काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

या रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात येणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा विचार करावा, असे प्रशासनाने सांगितले आहे.

 

वाहनधारकांनी नियोजनपूर्वक प्रवास करावा

सदर घाटात दरड कोसळण्याचा मोठा धोका लक्षात घेता नागरिकांनी या मार्गावर प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्ग निवडून नियोजनपूर्वक प्रवास करावा, अन्यथा गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!