भोर येथे राजगड भूषण-२०२४ भव्यदिव्य वारकरी सन्मान सोहळ्याच आयोजन.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
भोरचे कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे, भोर-राजगड तालुक्यातील सर्व वारकरी शिक्षण संस्था आणि जय हरी ग्रुप,वारकरी सांप्रदाय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भोरेश्वर लॉन्स भोरेश्र्वरनगर येथे राजगड भूषण-२०२४ भव्यदिव्य वारकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प कृष्णाजी रांजणे अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य वारकरी सांप्रदाय महामंडळ,
ह.भ.प ॲडव्होकेट पांडुरंग महाराज शितोळे हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आमदार संग्राम थोपटे,त्यांच्या पत्नी स्वरूपाताई थोपटे संस्थापिका अध्यक्षा अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रसंगीच्या कार्यक्रमास वारकरी सांप्रदायचे वारकरी बंधूंचा राजगड भूषण २०२४ सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करून गौरव करण्यात आला.
तसेच प्रसंगीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधवांना देखील सन्मानित करण्यात आले.

 
			

 
					 
							 
							