वादळात कोसळलेले विद्युत पोल अद्याप न दुरुस्त – सावरदरे(भोर) येथील शेतकरी संकटात;
संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
सावरदरे (ता. भोर) – सुमारे तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यांच्या तडाख्याने सावरदरे येथील काही विद्युत पोल आणि त्यावरील तारांसह पोल जमिनीवर कोसळले. या घटनेची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने महावितरणच्या भोर कार्यालयाला दिली असली तरी आजअखेर त्या ठिकाणी कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
पोल आणि विद्युत तारा शेतामध्ये आडवे पडले असल्यामुळे शेतकऱ्यांना मशागत व पुढील पेरणीची कामे करणे शक्य झालेले नाही. पावसाळ्याची सुरुवात होत असून वेळेवर पेरणी न झाल्यास उत्पन्नावर गंभीर परिणाम होणार आहे, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्याला या परिस्थितीचा फटका बसलेले असून प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल संताप व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवप्रहार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने महावितरणच्या भोर विभागाला निवेदन दिले असून आठ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास १६ जून २०२५ रोजी महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ही नैसर्गिक आपत्ती असूनही महावितरणच्या ढिसाळपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेचे अध्यक्ष यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “महावितरणने वेळेत लक्ष न दिल्यास भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला संपूर्णपणे महावितरण जबाबदार राहील.”
या अगोदरही 4 वर्षापूर्वी सारोळे गावात महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे शेतातील अशीच खांबावरील आर्थिक केबल खाली पडल्याने एका निष्पाप मुलाचा हाक नाक बळी गेला आहे.
महावितरण सांगते शेतात गावात कुठेही खांबावरील केबल तुटलेली असेल तर महावितरण विभाग यांना कळवा, शेतकऱ्याने सांगूनही महावितरण कारवाई करत नाही.
या घटनेची प्रत आणि निवेदन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, मा. एकनाथ शिंदे, मुख्य अभियंता बारामती, कार्यकारी अभियंता सासवड, कनिष्ठ अभियंता किकवी आणि भोर पोलीस स्टेशन यांना देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना वेळेवर शेतीसाठी वीजपुरवठा आणि सुरक्षितता मिळणे गरजेचे आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की महावितरण वेळेत जागे होते की आंदोलनाने पुढील दिशा मिळते. महावितरणाने वेळेत काम न केल्यास शिव प्रहार संघटनेच्या आंदोलनाला माझा पाठिंबा असणार. युवा सरपंच गणेश साळुंखे सावरदरे


