ऑनलाइन रमीच्या नादात चोरले शेतकऱ्यांचे विद्युत पंप :- वडगांव निंबाळकर पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या:- वडगांव निंबाळकर पोलिसांची कामगिरी,
उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी
बारामती तालुक्यांत जिरायती भागांतील शेतकऱ्यांचे विघुत पंप चोरणारी टोळी अखेर वडगांव निंबाळकर पोलिसांनी जेरबंद केली आहे, चोरीच्या गुन्ह्यातील सहा सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे, आरोपींकडून गुन्ह्यातील एकूण 3 लाख 16 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे जिरायती भागांतील शेतातील विहिरीतील विद्युत पंपाच्या चोरीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, याबाबत बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली, बारामती तालुक्यांतील लोणी भापकर सायंबाचीवाडी गावच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतील विद्युत पंप चोरीचे प्रकार वाढीस लागल्याने शेतकरी देखील हैराण झाले होते, त्याचबरोबर शेतातील पिके ही धोक्यात आली होती याच पार्श्वभूमीवर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. तौफीक मणेरी भाउसो मारकड यांनी गोपनीय माहिती काढत आरोपींची माहिती मिळवली, यामध्ये आरोपी नामे ओंकार राजेश आरडे (वय 25) महेश दिलीप भापकर (वय 31) अमोल लहू कदम (वय 28) निलेश दत्तात्रय मदने (वय 28) प्रथमेश जालिंदर कांबळे (वय 22 ) सर्वजण रा. लोणीभापकर ता. बारामती जि. पुणे) यांना ताब्यांत घेवुन चौकशी केली तसेच गोपनीय माहिती व तांत्रिक माहिंतीच्या आधारे आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी विद्युत पंप चोरी केल्याची कबुली दिली, आरोपी कालिदास शिवाजी भोसले (वय 42) रा. लोणी भापकर ) यांना चोरी केलेल्या विद्युत पंप विक्री केल्याची कबुली दिली, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे दिलीप सुतार आबा जाधव सुरज धोत्रे विजय शेंडकर शाहूराज भोसले नागनाथ परगे विलास ओमासे धनंजय भोसले राजेंद्र सावंत आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला,