घरात घुसून अपंग महिलेच्या गळ्यातील मंगल सूत्राची चोरी करणाऱ्या महिलेस लोणंद पोलिसांनी केले जेरबंद, लोणंद पोलिसांची कामगिरी,
पुण्यभूमी उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी
लोणंद पोलिसांनी जाधवआळी लोणंद येथे घरात घुसून बळजबरीने अपंग महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या संशयित महिलेला अटक केली असून, सौ. अंजली शेखर घोडके (वय 35) रा. लोणंद ता.खंडाळा जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे, याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून मनोज शरद घुले रा. जाधव आळी लोणंद यांच्या घरांमधून ( दि.११ ) रोजी त्यांची अपंग आई प्रेमा घुले या घरात एकट्या असताना एक अनोखी महिलेने घरात येवुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 50 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरून नेल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल होती, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून प्रभारी अधिकारी सुशील भोसले यांनी आपल्या पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमला सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगाने लोणंद पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास कसून केला असता संशयित महिलेला अखेर ताब्यांत घेतले यावेळी तिच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला आहे, सदर महिलेस अटक करून तिच्याकडून चोरी केलेले 50 मंगळसूत्र देखील हस्तगत करण्यात आली आहेत, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाणेचे स.पो.नि. सुशील भोसले पोलीस हवालदार संतोष नाळे सर्जेराव सूळ विठ्ठल कडे अभिजीत घनवट अमोल जाधव तसेच महिला पोलीस हवालदार शुभांगी धायगुडे आशा शेळके यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला असून, मा. पोलिस अधीक्षक सो. सातारा यांनी विशेष अभिनंदन केले,*