सातारा लोकसभा निवडणूक अनुषंगाने आज ढेबेवाडी ता.पाटण येथे महायुतीचा संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.


प्रतिनिधी सातारा : धर्मेंद्र वर्पे

खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी जनतेकडे दुर्लक्ष केले.

काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासने देऊन खोऱ्याने मते मिळवली परंतु जनतेकडे साफ दुर्लक्ष केले. देशाची उन्नती साधणाऱ्या भाजप सरकारला सत्ता देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.

कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी मी केली होती त्यानुसार हे महामंडळ स्थापन झाले सध्या आपल्या भागात विभाग मराठवाडी धरण दिसते तर याच कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून झालेले आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडे अनेक वर्षे ही सत्ता होती तर मग अशी कामे त्यांनी का मार्गी लावले नाहीत हा जाब जनतेने नेत्यांना विचारायला हवा.

ADVERTISEMENT

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले महायुतीचे सरकार पुन्हा सुट्टीवर यावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत त्यांनी माझ्याकडे साताऱ्या सह राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातून उदयनराजेंना मोठे लीड देण्याचा शब्द मी मुख्यमंत्र्यांना दिला आहे तो शब्द ढेबेवाडी खोऱ्यातील जनतेने पाळावा.

निष्ठावंत कार्यकर्ते पैशाला भूलत नाहीत देसाई कुटुंबाच्या चौथ्या पिढीवर निष्ठेने प्रेम करणारी पाटण भागातील ही जनता आहे. विरोधकांनी पोत्याने पैसा समोर टाकला तरी त्याला भूलणारी ही जनता नाही, ही जनता माझ्यासह उदयनराजेंच्या पठीशी राहणार आहे असे उद्गार शंभूराजे देसाई यांनी काढले.

ढेबेवाडी तालुका पाटण येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पालकमंत्री शंभूराज देसाई, भाजपचे प्रदेश सचिव भरत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, रणजीत पाटील, डॉक्टर दिलीप चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार,पंजाबराव देसाई, सीमा मोरे,कविता कचरे, गणेश यादव, राजेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!