खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार! साताऱ्यात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक.


सातारा प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे

जावळी तालुक्यातील बोंडारवाडी महू, हातगेघर,आंबळे या धरणांची कामे मार्गी लागण्यासाठी मी आग्रही आहे. मला या कामाचे श्रेय नको पण लोकांना पाणी मिळाले पाहिजे.

या निवडणुकीत घटक पक्षांना योग्य तो सन्मान दिला जाईल. महायुतीतील सर्व घटक पक्षांनी समन्वय ठेवून लोकसभेचा प्रचार करायचा आहे.

ADVERTISEMENT

कार्याध्यक्ष अमित कदम म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीचा प्रचार करण्याच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना सर्वच पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.आम्ही सर्वांनी उदयनराजेंच्या प्रचाराची जबाबदारी घेतली आहे. एडव्होकेट बाळासाहेब बाबर यांनी लोकसभा प्रचारासाठी स्वतंत्र यंत्रणा द्यावी अशी मागणी या बैठकीत केली.

सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) संवाद बैठकीत उदयनराजे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम,सातारा शहराध्यक्ष एडव्होकेट बाळासाहेब बाबर, जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे,माजी सभापती सुनील काटकर,सेवा दलाचे अध्यक्ष राजेंद्र लवंगारे,सागर भोगावकर, नितीन शिंदे, साधू चिकणे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष सीमा जाधव यांची उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!