अज्ञात वाहनाच्या धडकेत भोर तालुक्यातील रांझे गावातील तरुणाचा मृत्यू.
वेळू प्रतिनिधी : पुणे ते सातारा बाजूकडे जाणाऱ्या महामार्गावर वेळू गावच्या हद्दीत रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला.
याबाबत राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दि.२४/५/२४ रोजी वेळू ता. भोर जि. पुणे गावच्या हद्दीत पहाटे २ ते सकाळी ६:३० पुणे ते सातारा बाजूकडे जाणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून योगेश बाळासाहेब धोत्रे वय २९ वर्ष रांजे ता. भोर जि. पुणे यांना रस्ता ओलांडताना ठोस मारून अपघात केला, त्या अपघातात गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. जखमीस मदत न करता वाहन घेऊन पळून गेल्याने फिर्यादी रुपेश हनुमंत निंबाळकर यांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार चव्हाण करीत आहे.


