गावठी कट्टा बाळगून रुबाबात फिरणाऱ्या आरोपींला पोलिसांनी ठोकल्या बेड्या :- परळीत कट्टा व जिवंत काडतुसे हस्तगत.


 

संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सराईत चोऱ्या माऱ्या घरफोड्या तसेच दहशत माजवणाऱ्या आरोपींचा शोध घेवुन कारवाई करण्याच्या सुचना जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे, यामध्ये परळी मध्ये कंबरेला गावठी कट्टा लावून दहशत माजवणाऱ्या आणि रुबाबात वावरणाऱ्या तरुणाला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी परळीत ठोकल्या आहेत, यामध्ये तरुणांकडून एक कट्टा व जिवंत काडतुसे असे हस्तगत करण्यात आली आहेत, अजय उर्फ लोमट्या गौतम साळवे (वय 24 ) रा. फुलेनगर परळी ) असे ताब्यांत घेतलेल्या आरोपींचे नाव आहे, मागील चार दिवसांपासून पोलीस याच्या शोधात होते, लोमट्या हा कंबरेला कट्टा लावून परळी शहरांत राजरोस फिरत होता, यांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून बेड्या ठोकत कारवाई केली, त्याच्या विरोधांत संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, त्याच्याकडूंन गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 42.000 / हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, सदरची कामगिरी बीडचे जिल्हा पोलीस प्रमुख अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक उस्मान शेख आणि पो. हवा. विष्णू सानप मारुती कांबळे विकास राठोड बाळकृष्ण जायभाये सचिन आंधळे नितीन वडमारे यांच्या पथकांने या कारवाईत सहभाग घेतला, त्यांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!