भोर–राजगड तालुकास्तरीय ५३ वे शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न


 

नसरापूर (ता. भोर) येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या परिसरात भोर व राजगड तालुक्यांचे संयुक्त ५३ वे तालुकास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दोन दिवस चाललेल्या या विज्ञान प्रदर्शनात भोर व राजगड तालुक्यातील एकूण १३६ शाळांनी सहभाग नोंदवला असून हजारो विद्यार्थ्यांनी भेट दिली.

 

प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, पाणी व्यवस्थापन, ऊर्जा बचत, आरोग्य, मानवी शरीररचना तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रयोग, कार्यरत मॉडेल्स व प्रतिकृती सादर केल्या. बालवैज्ञानिकांनी आत्मविश्वासाने प्रकल्पांची माहिती देत उपस्थितांची दाद मिळवली.

ADVERTISEMENT

 

भोर तालुक्यातील १०३ तर राजगड तालुक्यातील ३३ शाळांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. प्राथमिक, माध्यमिक, शिक्षक, परिचर व दिव्यांग गटातील प्रकल्पांनी प्रदर्शन अधिक व्यापक व प्रेरणादायी बनवले.

 

समारोपप्रसंगी विविध गटातील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व परिचर यांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. मान्यवरांनी अशा विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती व आत्मविश्वास वाढतो, असे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता व नवकल्पनांची क्षमता या प्रदर्शनातून स्पष्टपणे दिसून आली.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!