स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त लोणंद येथे विविध कार्यक्रम
संपादक दिलीप वाघमारे
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त लोणंद येथे कृषी राज मंगल कार्यालयात स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती साजरी करण्यात येत आहे या जयंतीनिमित्त महसूल शासनाच्या वतीने महाराजस्व अभियान घेण्यात येणार आहे व तसेच महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आपणा सर्वांचे नेते आदरणीय नामदार मकरंद आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाआरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर व अपंगांना अॅक्रेलिक हात पाय मोफत देण्याचे नियोजन नामदार मकरंद आबा पाटील यांच्या सूचनेनुसार करण्यात आले आहे तरी सर्व तिन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती की आपण दिनांक 22 जुलै 2026 वार बुधवार 10 वाजता कृषिराज मंगल कार्यालय लोणंद येथे उपस्थित रहावे कारण हा कार्यक्रम वाई विधानसभा मतदार संघाच्या वतीने घेण्यात येत आहे


