भोर एज्युकेशन सोसायटीला CSR निधीतून संगणक संचासाठी ५०,०००/- रुपये अनुदान


पुणे, दि. ७ जून २०२५ – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्यादित, पुणे यांच्या Corporate Social Responsibility (CSR) निधीतून भोर एज्युकेशन सोसायटीला संगणक संच खरेदीसाठी रु. ५०,०००/- (पन्नास हजार रुपये) चा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश बँकेचे चेअरमन प्रा. डॉ. दिगंबरजी दुर्गाडे यांच्या शुभहस्ते व बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

ADVERTISEMENT

 

या कार्यक्रमास भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भोर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उर्फ लहू शिंदे, भोर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल धुमाळ, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश खोपडे, डॉ. सुरेश गोरेगावकर, डॉ. प्रदीप पाटील, सुरेशभाई शहा, डॉ. बिराजदार, दत्तात्रय मोरे, महादेव मळेकर, ताकवले, डेरे सर, निकम सर, पवळे सर, भागवत मॅडम, मोरे मॅडम, शिंदे मॅडम, उद्योजक सुरेश देवी, मिलिंद शहा यांच्यासह संस्थेचा स्टाफ आणि शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमात प्रमोद गुजर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. माननीय डॉ. दुर्गाडे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे सन्मान करून त्यांचे आभार मानण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!