लोणंद येथे श्री संत सेना महाराज मंदिरामध्ये दिंडी प्रमुखांना राहुटी स्टीलची भांडी औषधाचे किट वाटप संपन्न
संपादक: दिलीप वाघमारे
फलटण व खंडाळा तालुक्यातील संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्यामध्ये पायी वारी करणाऱ्या दिंडींना तरडगाव चे चोपदार श्री सुरेश जाधव व खंडाळा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह भ प श्री गजेंद्र मुसळे यांच्या प्रयत्नातून तसेच फलटण खंडाळा तालुक्यातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने लोणंद येथील श्री संत सेना महाराज मंदिरामध्ये. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार ह भ प श्री बाळासाहेब रणदिवे अण्णा यांच्या शुभहस्ते दिंडी प्रमुखांना राहुटी… स्टीलची भांडी…. औषधाचे किट वाटप करण्यात आले. यावेळी माऊली सेवा दल तरडगाव यांच्या वतीने फलटण खंडाळा तालुक्यातील बाल वारकऱ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार पुरस्कारांचें वाटप करण्यात आले .यावेळी चोपदार ह भ प श्री बाळासाहेब रणदिवे यांनी पालखी सोहळ्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी ह भ प श्री सोपान काका टेंभुकर पंढरपूर… ह भ प श्री दिलीप महाराज झगडे… ह भ प श्री संतोष महाराज जाधव… ह भ प श्री सत्यवान महाराज जाधव… माऊली सेवा दलाचे अध्यक्ष श्री. सतीश गायकवाड
आणि फलटण खंडाळा तालुक्यातील वारकरी व संत सेना महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री शंकरराव मर्दाने… कार्याध्यक्ष दिलीपराव साळुंखे सचिव श्री किशोर पवार डॉ. श्री दयाराम सूर्यवंशी श्री विकास साळुंखे श्रीमाऊली देवकर श्रीगणेश देवकर चोपदार श्री अशोक देवकर उपस्थित होते कार्यक्रमाची सूत्रसंचालन श्री गजेंद्र मुसळे यांनी केले तर आभार श्री शंकरराव मर्दाने यांनी मानले .


