सातारा- विरोधकांच्या फेक narative ला थेट narative ने उत्तर द्या- आमदार निरंजन डावखरे.


 

सातारा : धर्मेद्र वर्पे.

 

भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया बैठक आज सातारा येथे पार पडली.या बैठकीस सर्वप्रथम माध्यम प्रमुख नवनाथजी बन यांनी मार्गदर्शन केले.महाविकास आघाडी कसा फेक narative सेट करते तो कसा खुडून काढायचा याबाबत नवनाथजी यांनी मार्गदर्शन केले.यानंतर अजिंक्य कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्म वर अभ्यासू मांडणी कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले.

सोशल मीडिया प्रभारी श्वेताताई शालिनी यांनी प्रदेशाकडून येणारे कन्टेन्ट कसे प्रसारित केले पाहिजेल आपण सोशल मीडियावर कसे व्यक्त झाले पाहिजेल याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी सोशल मीडिया प्रदेश संयोजक प्रकाश गाडे यांनी सोशल मीडियावर आपले पॉसिटीव्ह काम कसे मुद्देसूद मांडले पाहिजेल याविषयी आणि संघटनेतील कामाविषयी मार्गदर्शन केले.

आमदार निरंजन डावखरे सोशल मीडिया केंद्रीय सामान्वयक म्हणाले याकाळात आपले केंद्रातील सरकार आपले राज्यातील सरकार जे काम करतय ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून केले पाहिजेल तसेच विरोधी पक्षांचा फेक narative आपण अभ्यासू मांडणीतून खोडून काढला पाहिजेल याबाबत मार्गदर्शन केले.

ADVERTISEMENT

कार्यक्रमाचे समारोपिय मार्गदर्शन पक्षाचे प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले.भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया वरील कार्यकर्त्यांनी आपण पक्षाचे प्रवक्तेच आहात असे समजून अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले पाहिजेल.सोशल मीडियावर विरोधकांना आक्रमक पण मुद्देसूद उत्तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिले पाहिजेल.असे विस्तृत मार्गदर्शन केशवजी यांनी केले.

आयटी सेल चे तेजस मालवीयजी यांनी ऍप च्या बाबतील मार्गदर्शन केले.प्रदेश सहप्रभारी मल्हार पांडेजी यांनी मार्गदर्शन केले.किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्णजी वेताळ, आर, आर पाटील पश्चिम महाराष्ट्र आयटी सेल संयोजक,संकेत कुलकर्णी,विकासजी गोसावी विठ्ठलशेठ बलशेटवार,राहूल शिवनामे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे यांनी केले.प्रास्ताविक सोशल मीडिया जिल्हा संयोजक रविंद्र लाहोटी यांनी केले.आभार आयटी सेल जिल्हा संयोजक संजय घार्गे यांनी मानले.यावेळेस सातारा,सांगली,हातकणंगले, कोल्हापूर,रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!