सारोळा केंद्रातील शिक्षकांची जि.प.प्राथमीक शाळा किकवी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद
कार्यकारी संपादक : सागर खुडे
सारोळा केंद्रातील सर्व शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी केंद्रप्रमुख विजयकुमार गुलाब थोपटे व रचना संस्थेचे कोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प. प्राथमीक शाळा किकवी या ठिकाणी संपन्न झाली.निपुण भारत अंतर्गत 3 ते 9 वयोगटातील विद्यार्थ्यांचे भाषा व गणित विषयातील पायाभूत स्तर उंचावणे पॉसको कायदा, सखी सावित्री समिती रचना व कार्य प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती मार्गदर्शन या विषयावर तज्ञ मार्गदर्शक महेश कुमार गाडगे आणि विद्या महादेव पापळ यांनी मार्गदर्शन केले.
तसेच महिला आणि फौजदारी कायदे या विषयावर केंद्रप्रमुख विजयकुमार थोपटे यांनी मार्गदर्शन केले शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी उपस्थिती दर्शवून सहकार्य केले.
यावेळी रचना संस्थेच्या कार्यकर्त्या मुक्ता घाडगे आणि इतर उपस्थित होत्या.शिक्षण परिषदेचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किकवी शिक्षक स्टाफ ने केले होते.
सारोळे केंद्रातील प्रत्येक शाळेत पॉस्को कायद्याविषयी लहान मुलांमध्ये जनजागृती करणार.” गुड टच बॅड टच” याविषयीची माहिती मुलींना देणार.
केंद्रप्रमुख विजयकुमार थोपटे


