सारोळे मार्गे वीर नीरा जेजुरी मार्गांवरील अनियमित एसटी बस सेवेच्या विरोधात पुणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश टापरे आक्रमक….
मुख्य संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
दि. १४ सारोळे : भोर तालुक्यातील भोर शहर हे तालुक्याच्या दृष्टीने प्रशासकीय कार्यालयासाठी केंद्र बिंदू असुन भोर शहरामध्ये सर्व प्रशासकीय,निमशासकीय ऑफिसेस तसेच तालुक्याचे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय,तहसील कार्यालय,भूमिअभिलेख कार्यालय येथेच स्थित आहे.आणि लोकांना या येथे शासकिय कागदपत्रांच्या बाबतीतल्या कामकाजासाठी भोर येथे वारंवार येणे बंधनकारक आहे. तालुक्यासह इतर गावांमधून लोक ये जा करीत असताना प्रामुख्याने भोर-वीर भोर – जेजुरी या मार्गावरील सुटणाऱ्या एसटी बसेस वेळेवर जात नाही तसेच वारंवार परिवहन महामंडळाकडून तसेच संबंधित प्रशासनाकडून या मार्गावरील बसेस कोणतीही अधिसूचना न देता रद्द करण्यात येतात त्यामुळे विद्यार्थ्यांसह वीर कडे जाणाऱ्या प्रवाश्यांचे अत्यंत हाल होत असून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, त्यासोबत या मार्गावरील निरा आणि वीर एसटी बस मार्गक्रमण करण्याच्या वेळेत बदल करून तासभर लवकर सोडण्यासाठी प्रयत्न करावे आणि शक्य तितक्या मार्गावरील सर्व बसेस नियमितपणे व वेळेवर सुटाव्यात ज्यामुळे वीर पूर्वभागातील भोरमध्ये दैंनदिन येणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, त्यांचा वेळ वाचावा तसेच पूर्वीपासून सुरू असणारी पूर्व भागातील हिंगेवाठार ही मुक्कामी एसटी बस गेली बरीच वर्ष चालू होती परंतू काही कारणास्तव बंद करण्यात आली असून ती एसटी बस सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी त्वरित पूर्ववत करून चालू करावी यासंदर्भात पुणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश टापरे यांनी एसटी परिवहन महामंडळ भोर आगाराचे व्यवस्थापकीय आधिकारी इंगवले , मंथा याची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. आणि जर सदरील प्रश्न लवकर सुटले नाही तर २०सप्टेंबर २०२४रोजी विद्यार्थ्यांसह एसटी परिवहन महामंडळ आगार भोर येथे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे युवक काँग्रेस अध्यक्ष महेश टापरे यांनी दिला


