विराट जनसागराच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज.


 

महाड प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

महाडसह महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचे आहे-आदित्य ठाकरे

खंडणीखोर आमदाराचा त्रास महाड, माणगांवमधील उद्योगांना-सुभाष देसाई

महाडमधील दडपशाही, गुंडशाही मोडून काढणार-स्नेहल जगताप

ज्यांनी पाठीत खंजीर खुपसून, उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हायला लावले, त्यांचे सरकार तुम्ही पुन्हा आणणार आहात का? असा सवाल उपस्थित जनसमुदायाला करित, यावेळेस महाडसह महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणायचे आहे, हे परिवर्तन करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज महाड येथे बोलताना केले, तर खंडणीखोर आमदारामुळे महाड आणि माणगांवमधील उद्योगांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्याचा गंभीर परिणाम रोजगार निर्मितीवर झाल्याचे टीकास्त्र, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आ. भरतशेठ गोगावले यांच्यावर सोडले. महाड मतदार संघातील दहशत आणि गुंडशाही मोडून काढण्यासाठीच आपण मैदानात उतरल्याचा निर्धार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाड विधानसभा मतदार संघातील उमेदवार स्नेहल जगताप यांनी बोलून दाखविला.

विराट जनसागराच्या साक्षीने प्रचंड शतीप्रदर्शन करित, महाड विधानसभा मतदार संघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्नेहल जगताप यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, पक्षाचे नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळेस हे नेते बोलत होते. यावेळेस दापोलीचे माजी आमदार संजय कदम, वरिष्ठ नेते हनुमंत जगताप, जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड, शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते बाळ राऊळ, विजयराज ख्ाुळे, काँग्रेसचे श्रीनिवास बेंडखळे, बाबूशेठ खानविलकर, जिल्हा महिला संघटक डॉ. स्वीटी गिरासे, उप जिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, जिल्हा प्रवते धनंजय देशमुख, श्रीयश जगताप, मोहन जगताप. योगेश सावंत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुद्दसिर पटेल, आदि नेतेमंडळी यांच्यासह महाड, माणगांव, पोलादपूर येथील जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळेस बोलताना आदित्य ठाकरे यांनी, आपली लढाई ही आमदारांसाठीची नाही, तर राज्याच्या भवितव्यासाठी असल्याचे सांगत यावेळेस परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार बोलून दाखविला. महाराष्ट्रात पुन्हा आपली सत्ता आल्यानंतर रोजगार, रोजगार आणि रोजगार हीच तीन कामे आम्ही प्राधान्याने करणार असल्याचे ते म्हणाले.

आपले सरकार असताना, साडेसहा लाख कोटींची गुंतवण्ाूक महाराष्ट्रात आणण्याचे काम आमच्या सरकारने केले. ते उद्योग गुजराथेत पळविण्याचे काम भारतीय जनता पक्ष आणि गद्दारांनी केले. आज येथे आपली सभा सुरु असतानाच, तिकडे गुजराथमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून पळविलेल्या एअरबस प्रकल्पाचे भ्ाूमीपूजन करित असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी निदर्शनास आण्ाून दिले. उद्योग पळविण्याचे हे प्रकार केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर झारखंड आणि उत्तरप्रदेश या राज्यांच्या बाबतीतही घडत आहेत. त्यामुळे त्या राज्यांतील तरुणांमध्येही प्रचंड अस्वस्थता आपल्याला पहायला मिळाल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT

आपल्याला राज्यात परिवर्तन घडवून आणायचे आहे. परिवर्तनाच्या या लढाईमध्ये तरुणांसह, महिला भगिनींचा सहभाग महत्वाचा आहे, असे आवाहन त्यांनी केले.

आज स्नेहल जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हा जो प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे, तो म्हणजे जनतेच्या स्नेहल जगताप यांच्यावरील प्रेमाचेच प्रदर्शन आहे. खरं तर आज आपण वरुण सरदेसाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार होतो, पण मला महाडला जावे लागणार असल्याचे सांगितल्यानंतर भावी आमदार स्नेहल जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाण्याची परवानगी त्यांनी दिल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

दादागिरी गाडायला एक वाघीण पुरेशी – सुभाष देसाई

शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी स्नेहल जगताप या वाघीण आहेत. या मतदार संघातील दादागिरी गाडायला ही एकच वाघीण पुरेशी आहे, अशा शब्दात स्नेहल जगताप यांचे कौतुक केले.

आम्ही सत्तेत असताना राज्यात उद्योग यावेत यासाठी रेड कार्पेट टाकले होते. मात्र, गद्दारांनी त्यावर खडे पसरण्याचेच काम केले. गुजराथमध्ये उद्योग स्थलांतरीत होत असताना, मिंधे सरकार गप्प बसले होते, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. महाड मतदार संघातील औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग न येण्यास खंडणीखोर आमदारच जबाबदार असल्याचा आरेाप त्यांनी केला. आपण उद्योगमंत्री असताना, अनेक उद्योजक आपल्याला भेटायचे. महाडच्या आमदारांच्या तक्रारी करायचे, उद्योगांचे अन्यत्र स्थलांतर करण्याची भ्ाूमिका ते मांडायचे, असे ते म्हणाले.

या मतदार संघातील पाच हजार तरुण रोजगारासाठी दरवर्षी मुंबई परिसरात त्याचप्रमाणे गुजराथमध्ये स्थलांतर करीत असतात. हे स्थलांतर आपल्याला रोखायचे आहे. महाडने चांगले आमदार दिले आहेत. ही परंपरा काही काळ खंडीत झाली होती. स्नेहल जगताप यांना आमदार करुन, ती परंपरा आपल्याला पुन्हा सुरु करावयाची असल्याचे आवाहन सुभाष देसाई यांनी यावेळेस केले.

दरम्यान, सभेपूर्वी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करुन, स्नेहल जगताप या गांधारी नायापासून निघालेल्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या. निघालेली ही भव्य रॅली खालूबाजाच्या तालावर वाजत गाजत, नाचत, आनंद व्यत करित कार्यकर्ते पुढे सरकत होते. एका जीपमध्ये उभ्या असलेल्या स्नेहल जगताप या दुतर्फा उभ्या असलेलया नागरिकांना हात जोडून अभिवादन करित होत्या. ही रॅली गांधारीनाका, साळीवाडा नाका, पिंपळपार, भगवानदास बेकरीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभास्थळी सुमारे तीन तासाने पोहोचली.

काल सकाळी स्नेहल जगताप यांनी प्रथम महाडचे आराध्य ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच शहरातील देवदेवतांचे दर्शन घेऊन, गांधारीनाका, साळावाडा नाका येथील दर्ग्यावर जाऊन, त्यांनी चादर चढवून दर्शन घेतले.

===============================

निजामपूर माणगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनातून मतदार महाड सभेसाठी चालले असताना वाहतुकीची कोंडी असणार्‍या ठिकाणी शिवसैनिक यांनी तातडीने वाहतुक व्यवस्था स्वतः राबवून त्यांनी शिस्त दाखवून दिली जय भवानी जय शिवाजी व उद्धव ठाकरे झिंदाबादच्या घोषणाही दिल्या पण एस टी मधील जाणारे येणारे प्रवाशी ही या घोषणांच्या सुरात सूर मिसळताना पाह्यला मिळाले……….

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!