नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे संभाजी पुरीगोसावी यांच्याकडून स्वागत, कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी म्हणून ओळख.


 

संभाजी पुरीगोसावी ( अह.नगर ) प्रतिनिधी.

ADVERTISEMENT

नगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नगर जिल्ह्याचे आदरणीय एसपी साहेब राकेश ओला यांची आज रोजी सकाळी पोलीस मुख्यालयात सातारा जिल्ह्याचे संभाजी पुरीगोसावी यांनी जयहिंद साहेब… असे म्हणत सदिंच्छा भेट घेवुन त्यांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे गेले दोन वर्षापासून संपर्कातून होती ओळख आज समक्ष भेटीचा योग आला, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख. 2012 च्या तुकडीतील अधिकारी असलेले सरळ सेवा भरतीने सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. सप्टेंबर 2014 मध्ये त्यांची नगर जिल्ह्यात श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली होती. दरम्यान तीन वर्षांपूर्वीच राकेश ओला हे नगरला येण्यास इच्छुक होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आयपीएस अधिकारी राकेश ओला यांनी नगर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून दिनांक 22 ऑक्टोंबर 2022 मध्ये पोलीस अधीक्षक म्हणून तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या बदलीनंतर पदभार स्वीकारला होता. त्यांनी आत्तापर्यंत मालेगांव नागपूर पोलीस उपायुक्त मध्यप्रदेश छत्तीसगड या ठिकाणी उत्कृंष्ट सेवा दिली. नागपुरांत त्यांची (कुल ऑफिसर) म्हणून ओळख झाली होती. नागपूर शहरांत उपायुक्त ग्रामीण मध्ये अधीक्षक व लाच लुचपत विभागांचे अधीक्षक म्हणूनही कार्यरत होते. पदभार घेतल्यापासून नगर स्वता: एसपी साहेब कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील, त्यांनी आत्तापर्यंत अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोणत्याही परिस्थितीत शांतपणे काम करण्याची त्यांची शैली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून उत्कृंष्टरित्या कार्यभार सांभाळला होता. राज्य गृह विभागाकडूंन आज पर्यंत अह.नगर जिल्ह्याला कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होते आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!