आ.छ.शिवेंद्रराजेंना कॅबिनेट मंत्रीपद देवून सन्मान करावा -वर्षाताई जवळ( मा. सरपंच जवळवाडी )
जावळी प्रतिनिधी :- सुनिल धनावडे
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या असून भा.ज.पा सह महायुतीला पूर्ण बहूमत मिळाले असून सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागाही महायुतीने मिळविल्या आहेत.लोकसभा निवडणूका वेळीही श्रीमंत छ.खा.उदयनराजे भोसले यांच्या विजयामध्येही छ.आ.शिवेंद्रराजे यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली असून या वेळी विधानसभेत त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळायलाच हवे परंतू छ.श्री.शिवाजी महाराजांचे वशंज असल्याने या घराण्याचा सन्मान हा व्हायलाच हवा अशा भावना जवळवाडी ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त मा.सरपंच वर्षाताई जवळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
जावली-सातारा विधासभेचे आमदार म्हणून श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये सर्वाधिक लक्षवेधी मताधिक्याने विजय मिळविला असून गेल्या चार विधानसभांमध्येही त्यांची कामगिरी दमदार राहीली आहे.आपल्या मतदार संघाबरोबरच इतरही मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. शेतकरी,महिला,युवक आणि सर्वसामान्य जनतेचे आमदार म्हणून छ.शिवेंद्रराजे भोसले हे नेतृत्व असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देवून सन्मान करावा अशी ईच्छा सातारा-जावली विधानसभा मतदार संघातील सर्वच माता- भगिनींची आहे.
चार टर्मचे आमदार म्हणून कामाचा प्रचंड अनुभव व सहकार क्षेत्रात अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे उत्कृष्ठ व्यवस्थापन करण्यातही ते यशस्वी ठरले आहेत तरी राज्य व राष्ट्रीय नेतृत्वाने छत्रपती घराण्याचे वारसदार म्हणून छ.शिवेंद्रबाबांना कॅबिनेट मंत्रीपद देवून सन्मान करावा.