विवाहाच्या छळवणुकीची भयंकर कहाणी: राजगडमध्ये बंडु कुटे कुटुंबावर गुन्हा दाखल.
खेडशिवापुर (प्रतिनिधी):-संपादक पुण्यभूमी न्यूज
राजगड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एक भयानक गुन्ह्यात विवाहानंतर एका महिलेवर तिच्या सासरकडून झालेल्या शारीरिक व मानसिक छळ करण्यात आले . फिर्यादी महिलेबरोबर 24 मे 2023 रोजी लग्न झाल्यानंतर, फिर्यादी महिला व त्यांचा नवरा अजिंक्य बंडु कुटे आणि त्याच्या कुटुंबाकडून शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी फिर्यादी महिलेने राजगड पोलीस ठाणे मध्ये तक्रार नोंदवत बंडू कुटे, अजिंक्य बंडू कुटे, भारती बंडू कुटे, प्रज्ञा मंगेश दळवी ,मंगेश शंकर दळवी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, , सासरकडील बंडू कुटे व कुटुंबातील सदस्यांनी फिर्यादी महिलेस पैशांची मागणी करत, तसेच तिच्या आई-वडिलांना प्रॉपर्टीतील 25 टक्के हिस्सा मागण्यास भाग पाडले. याशिवाय, नवऱ्याने लैंगिक समस्या असल्याचे सांगत या फिर्यादी महिलेवर केलेल्या दबावामुळे ती खूप त्रस्त झाली. आरोपी क्रमांक पाच मंगेश दळवी याने फिर्यादी महिलेचे यांचे मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले,यातून महिलेने राजगड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
या प्रकरणात अजिंक्य बंडु कुटे व त्यांचे कुटुंबावर व दळवी पती व पत्नीवर भादवी कलम 498 (अ), 354, 323, 504, 506, 34 आणि 494 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पाटील पोलीस उपनिरीक्षक राजगड पोलीस ठाणे तपास अधिकारी व पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
आरोपी अर्थात फिर्यादी महिलेचा पती अजिंक्य कुटे याने यापूर्वी विवाह केला असल्याची माहिती लपवली होती, ती देखील पोलीस तपासात उघडकीस आले.

 
			

 
					 
							 
							