लोणंद येथे कर्मवीर जयंती उत्साहात साजरी
उपसंपादक : दिलीप वाघमारे
लोणंद, ता.२२ : शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील (डी.लिट.) यांची १३७ वी जयंती निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या शाखा शरदचंद्र पवार महाविद्यालय, लोणंद, मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, लोणंद आणि न्यू इंग्लिश स्कूल(मुलींचे), लोणंद यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी केली.
यावेळी मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, लोणंद चे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शिक्षण समितीचे सदस्य यांच्या हस्ते शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शरदचंद्र पवार महाविद्यालय, लोणंदचे प्र. प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.आबाजी धायगुडे, न्यू इंग्लिश स्कूल(मुलींचे), लोणंद च्या प्राचार्या सौ.सुनंदा नेवसे, लोणंद संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व लोणंद नगरीतील ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील (डी.लिट.) यांचा रथ सजवन्यात आला होता. लोणंद संकुलाच्या वतीने सदर रथाच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. ही मिरवणुक मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज च्या मैदनापासून सुरु झाली व अहिल्यादेवी होळकर चौक – एस.टी. स्टँड – शास्री चौक –श्री. छ. शिवाजी महाराज चौक – दुर्गामाता मंदिर – बाजार तळ – भगवान महावीर चौक – नगरपंचायत या मार्गाने काढण्यात आली. मिरवनुकी दरम्यान विद्यार्थ्यानी “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’, ‘रयत शिक्षण संस्थेचा विजय असो’, ‘कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो’, ‘अमर रहे अमर रहे, कर्मवीर आण्णा अमर रहे’ अशा विविध घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण लोणंद परिसर दणाणून गेला. मिरवणुक नगर पंचायत जवळ पोहोचल्यावर विद्यार्थ्यानी लेझीम व झांज पथकातील खेळ,गजी नृत्य, पारंपारिक ढोल ताश्या असे विविध कार्यक्रम सादर केले. विद्यालयातील सहशिक्षक प्रा. जाधव एम.टी. यांनी पारंपारिक ढोल ताश्या , श्री.ठाकरे व्ही.एस. यांनी लेझीम तर श्री.गवळी ए.पी. यांनी गजीनृत्या साठी मार्गदर्शन केले. अशा प्रकारे विविध पारंपारिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.

 
			

 
					 
							 
							