शिवस्वराज्य’ यात्रा सोमवारी पाटणमध्ये!
डेरवण प्रतिनिधी शंकर माने: दि. 11 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षातर्फे राज्यभर सुरु असणारी ‘शिवस्वराज्य’ यात्रा सोमवार दिनांक १४ ऑक्टोंबर २०२४ रोजी पाटणमध्ये येणार आहे. पाटण येथील बा.दे. महाविद्यालयाच्या पटांगणावर सोमवारी दु. १२ वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत ही जाहीर सभा होणार आहे. माननीय आमदार जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, माननीय रोहिणी ताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, पंडित कांबळे प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, दिपक पवार व पक्षाचे सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पाटण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या शिवस्वराज्य यात्रेसाठी पाटण विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी, सर्व संस्था चेअरमन, व्हॉ.चेअरमन, संचालक, आजी/माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक/नगरसेविका, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेलार यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


