मोटारसायकल चोरट्याच्या वाई पोलिसांनी आवळल्या मुसक्या, दुचाकीसह आरोपी ताब्यांत :- वाई पोलिसांची कामगिरी


 

संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

ADVERTISEMENT

वाई शहरांत सध्या मोटर सायकल चोरांचे सत्र सुरूच असून वाई पोलीस व पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण विभागांचे पोलीस चांगलेच सतर्क दिसून असल्याचे येत आहेत. वाई पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने चोरीस गेलेल्या 1 लाख लाखांच्या दोन दुचाकीसह एकाच चोरट्यांस ताब्यांत घेतले आहे. ( जितेंद्र हनुमंत पवार रा. खानापूर ता. वाई जि. सातारा ) असे संशयितांचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून वाई शहरांतील रविवार पेठ चौकातील गणपतीच्या मंदिरांच्या बाजूला ऑटोसर्विस नावाचे दुकान आहे या मोकळ्या जागेत हँडल लॉक करून लाल निळ्या पट्टा असलेली हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक (एम.एच 11 सीई 06 89 ) ही अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल होती, तपासांच्या अनुषंगाने सदर गाडीची चोरी करणारा हा इसम खानापूर परिसरांतील असल्याची माहिती समोर आली होती. वाई पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना प्राप्त झाल्याने गुन्हे प्रकटीकरण विभागांचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांना सदर संशयित ताब्यांत घेण्याच्या सूचना दिल्या होत्या‌. त्यांनी खानापूर गावात सापळा लावून सदर संशयितांस ताब्यांत घेवुन त्याच्याकडे चौकशी केली यावेळी त्याने मोटरसायकल चोरीची कबुली पोलिसांना दिली त्याच्याकडूंन 1 लाख लाख 20 हजार रुपये किंमतीची दोन्ही मोटरसायकल हस्तगत करण्यात आली, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पोलीस पो.कॉ.राम कोळी पो.कॉ. नितीन कदम पो.कॉ. हेमंत शिंदे पो.कॉ. श्रावण राठोड पो. कॉ.विशाल शिंदे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला पुढील तपास पोलीस हवालदार पाटणकर करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!