पुण्यात जीवापेक्षा पैसा प्यारा ; आमदार “पीए”च्या गर्भवती पत्नीचा मृत्यू.


दि.4 पुणे :- पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली. उपचाराला उशीर झाला होता. म्हणून भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा प्रसृतीच्या दरम्यान जुळ्या मुलींना जन्म देऊन मृत्यू झाला आहे. दीनानाथ रूग्णालयात दाखल करण्यासाठी दहा लाखांची मागणी केली जात होती. रूग्ण गंभीर असताना देखील दाखल करून घेतले नाही, असा आरोप अमित गोरखे यांनी केला.

 

त्याचबरोबर या पिडीतेच्या नातेवाईकांनी देखील यावर पत्रकार परिषद घेत म्हटले आहे की, दीनानाथ रुग्णालयात गर्भवतीला जेव्हा रक्तश्राव होऊ लागला तेव्हा पूर्वी दिलेलीच औषध घेण्याचा सल्ला देण्यात आला. नाहीतर पूर्ण दहा लाख रुपये भरा तेव्हाच उपचार सुरू होतील. अशा स्पष्ट सूचना डॉक्टरांनी सर्व स्टाफला दिल्या होत्या. मग आम्ही तीन लाख घेऊन बिलिंग विभागात गेलो. मात्र पूर्ण पैसे नसल्यास रूग्णाला दाखल करणार नाही, असे मिनाक्षी गोसावी यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

 

तुम्हाला परवडत नसल्यास ससूनला जा, असा विचित्र सल्ला आम्हाला गर्भवती अत्यंत नाजून अवस्थेत असताना दिला गेला. हा सर्व प्रकार गर्भवतीने पाहिल्याने तिने त्याचा धसका घेतला आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाला, असा आरोप या नातेवाईकांनी केला आहे.

 

दोन जुळ्या मुलींना जन्म देऊन महिलेचा मृत्यू झाला. तिथल्या प्रशासनाने झुगारून त्यांना दाखल करून घेतले नाही. त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावे लागले. दुसऱ्या रूग्णालयात गेल्यानंतर त्यांना उपचार मिळाले. त्याठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली देखील झाल्या. परंतु दुर्दैवाने त्या आईचा त्याठिकाणी मृत्यू झाला. दीनानाथ रूग्णालय हे गरिबांसाठी आहे. परंतु अशा प्रकारचा अत्यंत मोठा गुन्हा केलेला आहे, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

 

पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मुख्य संपादक :मंगेश पवार

कार्यकारी संपादक :सागर खुडे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!