भोरच्या बाजारवाडीच्या डॉ.पूजा यांना दिल्ली एम्सची MDS पदवी प्रदान


पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज

मुख्य संपादक: मंगेश पवार

कार्यकारी संपादक: सागर खुडे

 

दिल्ली येथील एम्स या देशपातळीवरील अतिशय नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात भोरच्या बाजारवाडी गावच्या डॉ.पूजा निलीमा भिमराव शिंदे यांना MDS (मास्टर ऑफ डेंटल सर्जरी) पदवी देशाच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रिय आरोग्य मंत्री श्री जगत प्रकाश रेड्डी तसेच एम्स मधील डॉक्टर्स अधिकारी यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आली.

डॉ.पूजा या लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आहेत.दहावीला ९६.५५% मार्कस् मिळवून त्या भोर तालुक्यात प्रथम आल्या होत्या.त्याबद्दल त्यांना प्रभात पेपरचे पुणे जिल्ह्य़ातील ५१००० रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.शिक्षणाबरोबर त्या उत्कृष्ट चित्रकार उत्कृष्ट डान्सर उत्कृष्ट वक्तृत्व आणि कराटे ब्लॅकबेल्ट अशा सर्वगुणसंपन्न आहेत.त्यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण रथखाना प्राथमिक विद्यालय भोर पाचवी ते दहावी आर आर विद्यालय भोर अकरावी ते बारावी चाटे कॉलेज खेडशिवापूर बीडीएस वैद्यकीय पदवी शासकिय दंत महाविद्यालय मुंबई असा त्यांचा शैक्षणिक प्रवास आहे.देशपातळीवरील एमडीएस प्रवेश परिक्षेत महाराष्ट्रात प्रथम आणि देशात सातव्या नंबने ९९.९% मार्कस् मिळवून त्यांनी दिल्ली एम्समध्ये प्रवेश मिळवला होता.आणि आज त्यांनी एमडीएस पदवी मिळवली आहे.

ADVERTISEMENT

भोर सारख्या दुर्गम डोंगरी भागात राहूनसुद्धा कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी एवढे उत्तुंग यश मिळवून खेडेगावातील मुलांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.पूजाचे वडील भिमराव शिंदे शिक्षक आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे,तर आई निलीमा शिंदे आदर्श शिक्षिका असून त्यांना शनिवारवाडा लालमहाल येथे जिजाऊ जयंतीनिमित्त आदर्श माता पुरस्कार मिळाला आहे.पुजाचा आदर्श घेऊन बहिण प्रियांका MBA साठी देशातील अग्रगण्य असलेल्या आयआयएम कॉलेजला मेरिटमध्ये आली.तर भाऊ प्रज्वल परदेशात जर्मनी येथे एमएस हे उच्चशिक्षण घेत आहे.

भोर सारख्या दुर्गम डोंगरी तालुक्यात राहूनसुद्धा अभ्यास करुन जिद्द आणि चिकाटीने प्रयत्नाचे जोरावर त्यांनी एवढे उत्तुंग यश मिळवून सर्वच विद्यार्थ्यांपढे एक आदर्श निर्माण केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!