आरपीआय, वीर योद्धा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दोन एप्रिल चे हलगी नाद आंदोलन तात्पुरते स्थगित
संपादक दिलीप वाघमारे
दिनांक 2 एप्रिल रोजी चे खंडाळा तहसीलदार ऑफिस समोर तसेच पंचायत समिती खंडाळा या ठिकाणी पाडेगाव तालुका खंडाळा आंबेडकर सोसायटी येथील बेकायदेशीर वराह पालन हटवण्याबाबत निवेदन देऊनही कुठलीच प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे पाठीमागील 24 तीन 2025 रोजी प्रशासनाला निवेदन देऊन अल्टिमेटम दिला होता की लवकरात लवकर पाडेगाव आंबेडकर सोसायटीमधील बेकादेशीर वराह पालन हटवावे अन्यथा येणाऱ्या 2 एप्रिल रोजी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी हलगीनाद आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता त्या अनुषंगाने प्रशासनाने ग्रामपंचायत पाडेगाव तालुका खंडाळा येथे मीटिंग चे आयोजन केले होते त्या अनुषंगाने त्या मीटिंगमध्ये संबंधित वराह पालन मालक माने व इतर जणांनी लेखी आश्वासन दिले आहे की येणाऱ्या वीस दिवसात आम्ही पाडेगाव आंबेडकर सोसायटी लोकवस्ती मधील वराह पालन हटवू व तेथून दुसरीकडे दोन-चार किलोमीटरवर शिफ्ट करू असे लेखी दिल्यामुळे दिनांक 2 एप्रिल चे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए तसेच वीर योध्दा प्रतिष्ठान चे खंडाळा तहसीलदार ऑफिस समोर तसेच पंचायत समिती खंडाळा समोरील हलगी नाद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे या मीटिंग घडून आणण्या कामे ग्रामपंचायत पाडेगाव सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी ,पोलीस प्रशासन ,यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच पाठीमागील निवेदन दिल्यानंतर हा विषय पत्रकार बंधूंनी उचलून धरल्यामुळे त्याला गती प्राप्त झाली . पाडेगाव आंबेडकर सोसायटी मधील बेकायदेशीर वराह पालन हटवावे यासाठी पत्रकार मित्रांनी ज्या प्रकारे बातम्या प्रसिद्ध केल्या व हा विषय उचलून धरला त्या सर्वच पत्रकार मित्रांचे मनःपूर्वक धन्यवाद.
पाडेगाव ग्रामपंचायत मध्ये झालेल्या मीटिंगमध्ये वीर योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब ढावरे, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खंडाळा तालुका अध्यक्ष तथा वीर योद्धा प्रतिष्ठान सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पवन धायगुडे पाटील, वीर योद्धा प्रतिष्ठान कोर कमिटी सल्लागार तथा आरपीआय खंडाळा तालुका सल्लागार अनिल जी केदारी, वीर योद्धा प्रतिष्ठान खंडाळा तालुका अध्यक्ष सलीम भाई शेख, वीर योद्धा प्रतिष्ठान खंडाळा तालुका कार्याध्यक्ष चांद भाई शेख , अवघडे साहेब, ओंकार धायगुडे, ग्रामविकास अधिकारी मॅडम पाडेगाव , बीट आमलदार पाडेगाव भिसे साहेब, पोलीस पाटील पाडेगाव,सरपंच ,उपसरपंच,पाडेगाव आंबेडकर सोसायटी मधील ग्रामस्थ,तसेच आरपीआयचे तसेच वीर योध्दा प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


