गणेश शरदराव निगडे यांची पुणे उपजिल्हाप्रमुख (भोर)पदी अधिकृत नियुक्ती:- शिवसेनेकडून नियुक्तीपत्र देऊन गौरव.


संपादक: मंगेश पवार

कार्यकारी संपादक: सागर खुडे

दि.7 जून सारोळे (भोर) – शिवसेना पक्षाच्या भोर तालुक्यातील कार्यक्षम, निष्ठावान आणि जनसंपर्कात कुशल असलेल्या गणेश शरदराव निगडे यांना शिवसेना पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी अधिकृतपणे नियुक्त करण्यात आले आहे. दिनांक ०३ जून २०२५ रोजी त्यांना हा नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आला असून, त्यांचा कार्यकाल पुढील एक वर्षासाठी राहणार आहे.

 

ही नियुक्ती वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले असून, संपूर्ण भोर तालुक्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

हिंदुत्व, संघटनशक्ती आणि विकासाभिमुख नेतृत्वाची दखल

 

नियुक्तीपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, गणेश निगडे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा प्रचार आणि प्रसार करत, संघटनेच्या वाढीसाठी झटण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भोर तालुक्यातील शिवसेनेचे कार्य अधिक गतिमान होईल, असा पक्षश्रेष्ठींचा विश्वास आहे.

ADVERTISEMENT

 

गणेश निगडे यांच्या कार्याची पोचपावती

 

गणेश निगडे यांनी गेल्या काही वर्षांत भोर तालुक्यातील विविध विकासकामांमध्ये आघाडी घेतली आहे. एमआयडीसीचा विकास, शिवापूर टोल नाक्यावरील सुविधा सुधारणा, भोर एस.टी. डेपोमध्ये नवे विनंती थांबे व ग्रामीण भागात नव्या बसगाड्यांसाठी केलेले प्रयत्न, यामुळे स्थानिक जनता आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये त्यांची लोकप्रियता प्रस्थापित झाली आहे.

 

कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण

 

या नियुक्तीमुळे भोर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. अनेक ठिकाणी अभिनंदन सोहळ्यांचे आयोजन करण्यात येत असून, पुष्पगुच्छ, आणि मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात येत आहे.

 

 

 

“ही नियुक्ती माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. पक्षाच्या विचारसरणीवर निष्ठा ठेवून, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवणे आणि संघटना बळकट करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाला मी कृतीतून उतरवीन.” गणेश शरदराव निगडे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना (भोर)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!