मातोश्री कै.सौ.जनाबाई विठोबा पाडळे यांच्या पुण्यस्मरणां निमित्त विभागातील विविध शाळांना शालेय साहित्याचे वाटप
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
केळघर : जावली तालुक्यातील वाळंजवाडी येथील कै.सौ.जनाबाई विठोबा पाडळे यांच्या पुन्यस्मरणां निमित्त, चिरंजीव बळवंत विठोबा पाडळे केंद्र प्रमुख केळघर आणि त्यांचे कुटंबीय वाळंजवाडी ता.जावली यांचे वतीने आणि संवेदना सेवा फाउंडेशन यांचे तर्फे केळघर केंद्र आणि कसबे बामणोली केंद्रातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आज केळघर आसनी भोगवली मेढे ओखवडी, आसनीतळ, रेंगडीवाडी, रेंगडी मुरा या प्रत्येक शाळेत जाऊन करणेत आले. या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ शोभा धनावडे व सहकारी तसेच आसनीचे मुख्याध्यापक श्री.संपत शेलार व सहकारी, रेंगडीवाडी चे मुख्याध्यापक श्री.शंकर जांभळे आणि सहकारी आणि रेंगडीमुराचे मुख्याध्यापक श्री.अमोल जाधव व संतोष शेलार ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी श्री.दीपक गायकवाड गुरुजी केळघर संजिवन निकम सर, आसनी, आणि प्रमोद भोसले सर यानीं मनोगत व्यक्त केले. तर श्री.अमोल जाधव सर यानी स्वागत केले आणि आभार मानले.

 
			

 
					 
							 
							