मुळशीत पावसाच्या धारांमध्ये खेळ रंगला पैठणीचा! मुळशी तालुक्यातील सुनंदा तोंडे ठरल्या फोर व्हिरलच्या विजेत्या.


 

पिरंगुट : हजारो महिल्यांच्या उपस्थितीत शंकर मांडेकर युवा मंचच्या वतीनं आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमात काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये मुळशी तालुक्यातील सुनंदा तोंडे या फोर व्हीलरच्या विजेत्या ठरल्या.

 

पिरंगुट मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिवसेनेच्या (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर उपस्थित होते. पुणे जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर, पंचायत समितीच्या उपसभापती सारिका मांडेकर, उपजिल्हा प्रमुख संतोष मोहोळ, मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे, राजगड तालुकाप्रमुख दीपक दामुगडे, भोर तालुका प्रमुख शरद जाधव, हनुमंत कंक, महिला जिल्हा संघटक संगीता पवळे, स्वाती ढमाले आदी उपस्थित होते.

ADVERTISEMENT

 

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, बहिणींची थट्टा उडवणाऱ्या बदमाश लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. पंधराशे देऊन दहा हजाराचे बॅनर लावून आपल्या गरिबीची थट्टा उडवली जातीये. त्यामुळे शंकर मांडेकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान भावासोबत आपण राहील पाहिजे.

 

या कार्यक्रमास भोर, राजगड, मुळशी या तिन्ही तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भर पावसात ही तिन्ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या महिलांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचा आनंद लुटला.

 

चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांनी घेतलेल्या खेळांमधून कार्यक्रमात मोठी रंगत आणली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!