काळज येथे टोळक्याकडून एकाची निर्गुण हत्या.
उपसंपादक :दिलिप वाघमारे
ADVERTISEMENT
दि १४ काळज ता फलटण गावामध्ये आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल वरून आलेल्या टोळक्याने गावातील एकाची कोयता व धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहिती अशी, काळज गावातील नितीन तकदीर मोहिते वय ४० हे आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास समाज मंदिरात बसले असताना त्या ठिकाणी मोटर सायकल वरून आलेला अज्ञात युवकांनी त्यांच्यावर कोयता व धारदार शस्त्राने वार केले यामध्ये नितीन मोहिते हे गंभीर जखमी झाले त्यांना लोणंद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचाराआधीच त्यांची प्राणजोत मालवली या घटनेने काळजसह परिसरात खळबळ उडाली असून लोणंद पोलीस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत


