जावळी तालुक्याचा दिपस्तंभ ; जेष्ठ पत्रकार ते प्राध्यापक


 

सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

 

जन्म केडंबे, तालुका जावली, जिल्हा सातारा येथे एका गरीब अल्पभूधारक, कर्जबाजारी शेतकरी कुटुंबात १५ ऑक्टोबर १९४९ झाला.

बालपण फारच अभावात आणि हलाखीत गेले. पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण केडंबे गावीच झाले.

माध्यमिक शिक्षण केळघर येथील श्री भैरवनाथ विद्यालयात झाले. गरिबीमुळे शाळेची फी व पुस्तकासाठी पैसेही नसत. त्यामुळे विद्यालयात बॉयप्यून म्हणून आठवी ते दहावी तीन वर्ष काम केले. त्यावेळी केळघर विद्यालयात दहावी मॅट्रिक म्हणजे जुन्या ११ वी चा वर्ग नव्हता. व पुढे दुसरीकडे जाऊन शिकण्यासारखी आर्थिक परिस्थिती नव्हती. परंतु काळे आर एन या सरांनी माझी हुशारी पाहून स्वतःच्या खिशाला झळ सोसून मला सातारा येथील प्रॅक्टिसिंग हायस्कूलमध्ये अकरावीला प्रवेश घेतला.

तेथे जवळपास वर्षभर हाताने स्वयंपाक करून राहिलो. खोलीचे भाडे परवडेना म्हणून नोव्हेंबर ते मार्च अखेर मुख्याध्यापकांच्या परवानगीने शाळेच्या मागच्या बाजूच्या व्हरांड्यात राहू लागलो.

त्यावेळी शिवाजी कॉलेजचे प्राचार्य एस के उनवणे यांचा मुलगा विजय माझ्याच वर्गात शिकत होता. तोही हुशार होता. त्यामुळे आमची मैत्री जमली व मी अभ्यासासाठी त्यांच्या बंगल्यावर जाऊ लागलो. त्यामुळे प्राचार्य उनवणे सर यांच्याशी माझी चांगली ओळख झाली होती. पुढे मी मॅट्रिक झाल्यानंतर माझी घरची गरिबीची परिस्थिती पाहून त्यांनी मला शिवाजी कॉलेजला लेबर स्कीम मध्ये प्रवेश दिला.

लेबर स्कीम मध्ये राहुन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळ संध्याकाळ तीन तीन तास अंग मेहनतीची कामे करावी लागत असत. इमारतीसाठी खडी फोडणे, दगड विटा वाहने, पिलर- बीम भरणे, स्लॅब टाकणे तसेच बैल व म्हशी सांभाळणे आणि शेतीचे सर्व कामे करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत. या कामाच्या मोबदल्यात आम्हाला जेवण राहणे व पुस्तके मोफत मिळत तसेच फी माफ होत असे अशाप्रकारे चार वर्ष प्री डिग्री ते बी ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

ADVERTISEMENT

यावेळी खरे तर मला नोकरीची खूप आवश्यकता होती. घरी कुटुंबीयांची खूप हाल-अपेष्टा चाललेली होती. परंतु श्री काळे सरांची इच्छा मी प्राध्यापक व्हावे अशी होती. प्राचार्य उनवणे सरांना ही तसेच वाटत होते. म्हणून ते म्हणाले तू आता नोकरीच्या मागे लागू नकोस. कोल्हापूरला कमवा आणि शिका योजना सुरू झालेली आहे. तेथे प्रवेश घे. दोन वर्ष एम ए कर. एम ए झाल्यानंतर मी तुला आपल्या संस्थेत प्राध्यापक बनवेन. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनच्या कमवा आणि शिका योजनेमध्ये मी प्रवेश घेतला. दोन वर्ष विटा बनविणे शेतीची सर्व कामे करणे कॅन्टीन मॅनेजरचे काम करणे, पिठाची चक्की चालवणे इ. अंग मेहनतीची कामे करून एम ए झालो. पण दुर्दैवाने एम ए च्या प्रथम वर्ष अखेरीस मे १९७२ ला प्राचार्य उनवणे यांचे विद्यापीठातच दुःखद निधन झाले. त्यामुळे पुढे कॉलेज प्राध्यापक होण्याचे माझे स्वप्न भंग पावले.

अशाप्रकारे प्रतिकूल परिस्थितीत माझ्या आई-वडिलांनी मला फार मोठा मानसिक आणि शाब्दिक आधार दिला.तर श्री. काळे सर आणि प्राचार्य उनऊने सर यांनी माझी आर्थिक परिस्थिती जाणून योग्य सल्ला देत मला सक्रिय सहकार्य केले. त्यामुळेच माझे पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.

पुढे महात्मा गांधी विद्यालय पाचवड येथील एक शिक्षक बी एड साठी रजेवर गेले होते. त्यांच्या जागी संस्थेने मला जुलै १९७३ ला तात्पुरती उपशिक्षकाची ऑर्डर दिली. पुढे ३१ मार्च १९७४ ला मला सेवा मुक्त करण्यात आले. दरम्यान १९७५ सली ज्युनिअर कॉलेजेस सुरू होणार होती यासाठी एम ए बी एड ही शैक्षणिक पात्रता आवश्यक होती. परंतु त्यावेळी बीएड प्रवेश जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येत असल्याने मला बी एड प्रवेशासाठी सातारा ते ठाणे- उल्हासनगर पर्यंत धावपळ

करावी लागली. अखेर सातारा जि प तर्फे आजाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा. येथे बीड साठी मला प्रवेश मिळाला.ल प्रवेश मिळाला खरा पण आर्थिक चणचणीमुळे वर्ष काढायचे कसे हा एक मोठा प्रश्न होता. त्याचवेळी पाचवड चे माझे सहकारी व रूम मेट श्री मोहिते एमटी यांनीही बी एडला प्रवेश घेतला होता. त्यामुळे आम्ही दोघे व अन्य दोघे विद्यार्थी डॉक्टर असे मिळून एकत्र खोली खोली घेऊन एकत्र राहिलो. स्वयंपाकाला मावशी होती. त्यामुळे बीएडचे ते एक वर्षेही कसेतरी निभावून गेले. अखेर मी बी एड झालो. त्यामुळे सीनियर कॉलेजचा नाही पण जुनिअर कॉलेजचा तरी प्राध्यापक होता आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!