महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू! मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून फॉर्म भरले जाणार.


 

उपसंपादक : दिलीप वाघमारे

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात जगण्यासाठी आणि वयात परत्वे येणारे अपंगत्व यामध्ये मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचे फॉर्म माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन च्या वतीने गुरुवारपासून भरण्यात येणार असून पात्र जेष्ठ नागरिकांनी अनुप शहा यांच्या संपर्क कार्यालयात भरण्यात येणार आहेत तरी याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन फलटण शहर भाजपचे अध्यक्ष अनुप शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

ADVERTISEMENT

या योजनेनुसार जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात शासनाकडून देण्यात येणार असून याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे फॉर्म भरण्यासाठी येताना नागरिकांनी आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकांचे पासबुक शक्य असल्यास शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला व पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घेऊन यायचे आहेत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सदरचे फॉर्म भरले जाणार असून पात्र व इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी नागरिकांनी अनुपशहा यांच्याकडे दूरध्वनी नंबर 96 89 94 1008 या क्रमांकावर संपर्क साधावा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!