मांढरदेव येथील विवाहितेचा छळ, वाई पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
वाई तालुक्यातील मांढरदेव येथील सौ. शकुंतला विशाल खुडे वय २६ हिचा दि. २७ फेब्रुवारी २०२३ पासून तुझ्या लग्नात तुझ्या वडिलांनी लग्नाला हॉल व्यवस्थित घेतला नाही. भांडी छोटी दिली आहेत. आईवडिलांनी नीट संस्कार केले नाहीत. आमचा मानपान केला नाही. असे म्हणत तिचा पती विशाल खुडे, सासू संगिता खुडे, सासरे दौलत खुडे, दीर वैभव खुडे, जाव अनघा वैभव खुडे सर्व रा. देगाव ता. भोर यांनी शारिरीक व मानसिक छळ केला. याचा गुन्हा दि. १३ मे रोजी दुपारी ४.२६ मिनिटांनी वाई पोलीस ठाण्यात दाखल केला असून याचा तपास महिला पोलीस हवालदार मुजावर या करत आहेत.