त्या व्यक्तीवर अंनिस आणि गावकऱ्यांचा पुढाकाराने गुन्हा दाखल ; वरखड़वाडी येथील घटना .


वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

 

दि.१३/५/२०२४ वरखड़वाडी ता. वाई येथे डोंगरचे कुशीत शांत गावाच्या बाहेरच्या बाजूला डोंगर भागात वाघजाई मंदिरा कड़े जानाऱ्या रस्त्यात पायथ्यासी देवीच्या पालखी विसवा या करवंदिचे जाळी मध्ये ५ फूट रूंद,६ फूट लांब,५फुटखोल असा खड्डा खाणून त्या भोवती लिंबू, हळकुंड,हिरवी बांगडी, सारखे तंत्र,मंत्र साहित्य पसरवाल्याचा प्रकार 12 तारखेला समोर आला. या विषयी डॉ हमीद दाभोलकर यांना मिळालेल्या माहितीनुसार सातारा येथुन महाराष्ट्र अंनिस तर्फे सत्यशोधन समिती सदस्य डॉ. दिपक माने,वंदना माने ,प्रमोद भिसे (वाई) रणवीर गायकवाड यांनी या ठिकाणी भेट दिली. तेव्हा उपसरपंच नितिन वरखडे, पोलीस पाटील सदानद जाधव वरखड़ वाडी/(भोगाव ). ग्रामसेवक मल्हार शेळके , व २० ते २५ग्रामस्थ संबंधित ठिकाणी उपस्थित होते. संपूर्ण गावा मध्ये ह्या गोष्टी मुळे दहशत पसरली असून नरबळी सारखा अघोरी प्रकार करण्या साठी असा खड्डा खणलेला असू शकतो अशी गावकऱ्यांची धारणा होती .गेल्या वर्षी इथूनच जवळ धावजी पाटील देवस्थानाच्या जवळ असा प्रकार उघडकीस आला होता त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अनिस मार्फत या प्रकरणाची माहिती वाई पोलीस स्टेशन इथे देण्यात आली तसेच सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समिर शेख यांना देखील ही गोष्ट सांगण्यात आल्यावर त्यांच्या मार्गदर्शनात वाई पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री जितेंद्र शहाणे PI यांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करून त्या मध्ये तथ्य आढळल्याने अनिस कार्यकर्ते दीपक माने यांच्या तक्रारी वरून जादुटोणा विरोधी कायद्या अंतर्गत त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला .पुढील तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत मुगाने करीतआहेत.

ADVERTISEMENT

वाई पोलीस स्टेशन येथे वैभव पवार,, श्री कुंभार यांचे सहकार्य लाभले.

अशा स्वरूपाचे अंधश्रध्दा ना बाढवा देणारे प्रकार आपली आजूबाजूला दिसले तर तातडीने महाराष्ट्र अंनिस कडे अथवा आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याकडे तक्रार नोंदवावी अशी माहिती महाराष्ट्र अनिस मार्फत दिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!