कोळवडी येथे विहिरीचे खोदकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू! क्रेन ड्रायव्हर परवेज आलम यांच्यावर गुन्हा दाखल.
मंगेश पवार
सारोळे
कोळवडी ता. भोर जि. पुणे येथे विहिरीचे खोदकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राजगड पोलिसांनी क्रेन ड्रायव्हर परवेज आलम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळवडी ता. भोर जि. पुणे गावच्या हद्दीत दि.२९/४/२४ रोजी दुपारी१:३० वाजेच्या सुमारास खोदकामाच्या ठिकाणी सहा चाकी क्रेन नंबर MH १२ WP ७२८४ वरील ड्रायव्हर परवेज आलम रा. कमालुद्दीन नट,धरम परसा, गोपालगंज, बिहार याने आपल्या ताब्यातील क्रेनने विहिरीतील गाळ लोखंडी बकेट मध्ये भरून विहिरीच्या वरती खाली करून, परत खाली सोडताना मोकळ्या बकेटमध्ये १) अंकुश प्रभाकर गेडाम वय २४ वर्ष रा. येवली रामपुरी ता.जिल्हा गडचिरोली २) विजेंद्र रामानंद भारतद्वाज वय ४९ वर्षे रामानंद खडकी, भरतावबलिया, उत्तर प्रदेश या दोन कामगारांना बसून विहिरीमध्ये खाली सोडत असताना, क्रेन हयगईने अविचाराने आणि कामाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सदर क्रेनचा वायरोप तुटून लोखंडी बकेट विहिरीमध्ये खाली पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला.
त्यानंतर दि.१४/५/२४ रोजी क्रेन ड्रायव्हर परवेज आलम याच्या विरोधात राजगड पोलीस स्टेशन मध्ये अजित पाटील पोलीस उपनिरीक्षक यांनी फिर्याद दिली आहे.
याचा तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ ढावरे करीत आहे


