सामाजिक कार्याचा वसा जोपासणारे चोरांबे आदर्श गाव!


 

सातारा प्रतिनिधी :- बजरंग चौधरी

 

मेढा : – जावली तालुक्यातील चोरांबे या गावात राबविले जाणारे सर्वच उपक्रम आदर्शवत व कौतुकास्पद असून गेली अनेक वर्ष एक गाव एकच गणपती उत्सव साजरा करीत असताना जावलीच्या मातीत घडलेल्या व समाजासाठी कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचा सामाजिक गौरव पुरस्कार देवून सन्मान करणारे चोरांबे हे जावली तालुक्यातील आदर्श गाव असल्याचे गौरवोदगार व्यसनमुक्त युवक संघाचे मा.अध्यक्ष  विलासबाबा जवळ यांनी चोरांबे येथे पुरस्कार कार्यक्रमात बोलताना सांगितले.

गणेशोत्सवाचे निमित्ताने सर्वोदय क्रांती गणेशोत्सव मंडळ चोरांबे येथे महाप्रसाद व गुणगौरव सोहळा आयोजीत करण्यात आला होता.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.आ. सदाशिवभाऊ सपकाळ होते. यावेळी  विलासबाबा जवळ यांचा सामाजिक गौरव पुरस्कार देवून व रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झालेले कृष्णानाना सपकाळ यांचा सपत्नीक व प्राथमिक आरोग्य केंद्र केळघर येथे रूजुझालेल्या डाॅ.रूचिका दुंदळे, पदोन्नती मिळालेले ग्रामविकास अधिकारी रविकांत सपकाळ यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच विजय सपकाळ, संतोष दुंदळे, अरूण जवळ,मा.सरपंच भिवराम सपकाळ सुर्यकांत सपकाळ राजेश सपकाळ व श्रीकांत सपकाळ,किरण सपकाळ,अनिल सपकाळ, सचिन सपकाळ,तुकाराम सपकाळ,श्रीरंग सपकाळ, ज्ञानदेव सपकाळ, विजय सपकाळ गुरुजी,श्रीधर सपकाळ, दत्ता सपकाळ, लहूदास सपकाळ ग्रामस्थ, युवक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ADVERTISEMENT

यावेळी बोलताना मा.आ. सदाशिव सपकाळ यांनी चोरांबेकरांच्या प्रामाणिक कार्याच्या पाठीमागे पदमावती देवीचा आशिर्वाद असून चोरांबेतील अनेक उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरत असल्याचे सांगितले.

विलासबाबा जवळ पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले सामाजिक चळवळींना पाठबळ देण्याचे काम एकजुटीने चोरांबेकर करीत असून सामाजिक कार्यकर्त्यांना शाबासकीची थाप देवून लढण्यासाठी बळं देणे आदर्शवत व कौतुकास्पद असल्याचे गौरवदगार त्यांनी काढले. यावेळी डाॅ.रूचिका दुंदळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच विजय सपकाळ यांनी केले तर सुत्रसंचलन अंकुश सपकाळ गुरूजी यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!