मंदिरातील चोरी करणाऱ्या सिनेस्टाईलने पाठलाग करीत आरोपींच्या आवळल्या मुसक्या :- सुपा पोलिसांची दमदार कामगिरी.


 

संभाजी पुरी गोसावी

पुणे ग्रामीण जिल्हातील तसेच शोजारील सातारा जिल्यातील मंदिरात चोरीच्या घटना घडलेल्या होत्या. सदरच्या चो-या या मंदिरात होत असल्याने व तो लोंकाच्या भावनेचा व श्रध्देचा विषय असल्याने सदरचे आरोपी हे अटक करणे हे एक मोठे आव्हान झाले होते. सदरचे घडणारे गुन्हयाबाबत मा.पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक  गणेश बिरादार, मा.उप.विभागिय पोलीस अधिकारी  सुदर्शन राठोड यांनी मंदिर चोरी करणा-या आरोपी शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक १६/०९/२०२४ रोजी रात्रगस्त अधिकारी स.पो.नि. नवसरे यांनी रात्रगस्त साठी असनारे अंमलदार यांना रात्रगस्त करुन मंदिरातील चो-या होवु नये या करीता पोलीस स्टेशनचे रात्रगस्त अमंलदार पो. कॉ. १६३४ सचिन दरेकर व पो. कॉ.१८६ सागर आशोक वाघमोडे यांना सुचना दिल्या होत्या. रात्रगस्त दरम्यान मौजे दंडवाडी गावचे हददीत रात्रगस्त करीत असताना एक मारूती सुझुकी कंपनीची अल्टो ८०० कार नं एम.एच.१२ सी.डी. ६७५७ ही रोडचे कडेला नंबर प्लेटवर चिखल लावुन संशईत रित्या थांबलेली दिसली. रात्रगस्त अंमलदार हे सदर गाडीजवळ जाताच गडीतील इसमाने सदरची गाडी वेगात सुपे बाजुकडे घेवुन गेला. त्याच वेळी शेजारीच असलेल्या विठठ्ल मंदिरातील दोन अनोळखी इसम हे त्या ठिकाणहुन अंधारात पळुन गेले. त्यावेळी रात्रगस्त अंमलदार यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ रात्रगस्त साठी असलेले सहा. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांना दिली. ते तात्काळ स्टाफसह सदर ठिकाणी आले. कार घेवुन पळालेल्या इसमाचा पाटलाग करुन त्यास लोणंद जि.सातारा येथून ताब्यात घेतले. तसेच अंधाराचा फायदा घेवुन पळालेल्या इसमांना देखील शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अनुक्रमे १) ओंमकार शशिकंत सांळुखे रा. आनंदपुर ता. वाई जि. सातारा सध्या रा. शिरवळ पंढरपुर फाटा ता.खंडाळा जि.सातारा २) तुषार अनिल पवार रा. दत्तनगर सांगवी रोड ता. खंडाळा जि.सातारा ३) सौरभ दत्तात्रय पाटणे रा. शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा व एक विधीसघर्ष बालक अशी असून त्यांचेकडुन १५ लहान मोठया घंटा,१ पानेश्वर देवाची मुर्ती, २ मुकुट, २ समई,१ पंचार्थी,असा माल हस्तगत करण्यात आलेला असुन खालील गुन्हयाची उखल झालेली आहे.

ADVERTISEMENT

 

सदर आरोपीं यांनी वाई, राजगड, लोणंद, सातारा, जेजुरी व इतर ठिकाणी सदर प्रकारचे गुन्हे केल्या बाबत सांगत असल्याने तेथील गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक  पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, मा.उप.विभागिय पोलीस अधिकारी  सुदर्शन राठोड यांचें मार्गदर्शनाखाली, स.पो.नि.मनोजकुमार नवसरे, स.पो.नि. कुलदिप संकपाळ, पो.स.ई . जिनेश कोळी, सहा. फौजदार कारंडे, पो.हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, अनिल दनाणे अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, विनोद पवार, पो. कॉ. सचिन दरेकर, सागर वाघमोडे,संतोष जाविर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे, रुषीकेश विर, होमगार्ड शिवतारे यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!