सारोळे ते वीर तसेच भोंगवली ते माहूर खिंड रस्त्यांवर शिवप्रहार प्रतिष्ठान आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून आंदोलनं….


 

मुख्य संपादक: मंगेश पवार

कार्यकारी संपादक: सागर खुडे

 

दि. २०  सारोळे ते भोंगवली आणि भोंगवली ते माहूर खिंड आठ दहा किलोमीटर अंतरावरील रस्ता अत्यंत खराब झाला आहे.ठिकठिकाणी खड्डे पडल्याने स्थानिक आणि इतर प्रवाशांना वाहन चालवणे अवघड झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली, मात्र दुरूस्ती झाली नाही. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

हा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी शिवप्रहार प्रतिष्ठानचे वतीने वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने शिवप्रहार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांनी आज २०सप्टेंबर रोजी पांडे येथे झाडावर चढुन शोले स्टाईलने आंदोलन करीत या विषयी आपला निषेध व्यक्त केला.परंतू आंदोलनस्थळी आंदोलनातील सहभागी आंदोलकांची आणि सारोळे भोंगवली ग्रामस्थांची बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी समक्ष भेट घेत काम पूर्ण करून देण्याचे पत्र देऊन आश्वासन दिले.आणि आंदोलकांच्या मागणीनुसार लवकरात लवकर काम करून देण्याची तोंडी आणि लेखी पत्रासह ग्वाही दिल्यानंतर आंदोलनास स्थगिती देण्यात आली.

या आंदोलनासाठी शिव प्रहार संघटना अध्यक्ष संतोष मोहिते, राजापूर गावचे सरपंच बाळासाहेब बोबडे, भरत बोबडे, माऊली बोबडे, नाना खुटवड, बागल, प्रहार जनशक्ती पक्ष उपाध्यक्ष अजय कांबळे, भोंगवली गावचे सरपंच अरुण पवार, सावरदरे गावचे सरपंच गणेश साळुंखे,अक्षय साळुंखे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!