तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत दिनकरराव धाडवे पाटील विद्यालयाची बाजी.
मुख्य संपादक:मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद क्रीडा विभाग पुणे आयोजित भोर तालुक्यातील सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय, खानापूर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सारोळे येथील दिनकरराव धाडवे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सारोळे मधील विद्यार्थ्यांनी यावर्षीही घवघवीत यश संपादन केले.विद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील मुलांचा संघ उत्कृष्ट कामगिरी करत असलेमुळे खरतर हा विजयी ठरला. या संघाची निवड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी झाली आहे, तसेच १९वर्षे वयोगटातील मुलींचा संघ आणि १७ वर्षे वयोगटातील मुलींचा संघ हा उपविजेता ठरला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री मोहन ताकवले सर यांनी अभिनंदन केले. यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री. प्रमोद गुजर व स्कूल कमिटीचे चेअरमन डॉ.प्रदीप पाटील आणि सेक्रेटरी श्री.प्रकाश गोरे यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून श्रीमती वीर मॅडम, श्री.शिंदे सर,श्री.पवार सर आणि श्री.धाडवे सर यांनी प्रमुख म्हणून काम पाहिले.