आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एस. एन. नांदेडकर सरांची निवड
पुणे | प्रतिनिधी :- पैलवान सुभाषदादा पाटील यूथ फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २०२५-२६ अंतर्गत संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व पत्रकार) यांची राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सामाजिक जीवन, नवउद्योजक, कृषीक्षेत्र, कला-रंजन आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून आलेल्या अर्जांमधून नांदेडकर सरांच्या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आल्याचे फाउंडेशनकडून सांगण्यात आले.
पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी दिलेले योगदान आणि पत्रकारितेद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिशा मिळाली असून समाजात सकारात्मक बदल घडवण्यास मदत झाली आहे.
लवकरच भव्यदिव्य स्वरूपात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये नांदेडकर सरांचा सन्मान करण्यात येणार आहे. या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. असे माध्यमांशी बोलतांना पैलवान सुभाषदादा पाटील यूथ फाउंडेशनच्या वतीने कळविण्यात आले.


