न्हावी शाळेतील चिमुकल्यांनी क्षेत्रभेटीचा घेतला आनंद; सचिन जगताप व प्रमोद सोनवणे यांनी चिमुकल्यांना केली मोलाची मदत.
दि.५ सारोळे : शालेय उपक्रमांतर्गत न्हावी शाळेतील विद्यार्थ्यांनी न्हावी गावातील विविध ठिकाणी भेट देऊन शालेय क्षेत्र भेटीचा अनुभव घेतला.
क्षेत्रभेट हा एक शालेय जीवनातील कार्यक्रम आहे. यालाच शालेय सहल किंवा शैक्षणिक सहल देखील म्हणतात. एखाद्या क्षेत्राला भेट देणे म्हणजे क्षेत्रभेट. शैक्षणिक क्षेत्रात क्षेत्रभेट म्हणजे वर्गाबाहेर कोणत्याही क्षेत्राला भेट देणे.
यावेळी प्रथम विद्यार्थ्यांनी न्हावी १५-प्राथमिक आरोग्य केंद्र भेट देऊन माहिती घेतली.
२) ग्रामपंचायत न्हावी १५ कार्यालयास भेट- ग्रामपंचायतची कामे व कामकाज मुलांनी समजून घेतले.
3) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,शाखा न्हावी भेट-कामकाज कसे चालते ? त्याबाबत विध्यार्थ्यानी माहिती घेतली.
4) कृष्णाई रिसॉर्ट न्हावी १५ भेट.
वरीलप्रमाणे क्षेत्रभेट उपक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अतिशय छान माहिती सांगितली व विध्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून माहिती घेतली.
कृष्णाई रिसॉर्टवर मुलांनी खेळ, गाणी, नृत्य, शिवार फेरी, परिसर शेतीची माहिती घेतली.
सचिन जगताप यांनी मुलांना कृष्णाई रिसॉर्ट सर्व सुविधासहित मोफत मुलांसाठी उपलब्ध करून दिला.
प्रमोद सोनवणे यांनी १०० मुलांना मिसळ-पाव बेत नियोजन करून दिले.
कार्यक्रम सुंदर झाला. मुलांनीही ताव मारला.
2 री /3री /4 थीच्या मुलांनी दिवसभराचे अनुभव लेखन केले.
क्षेत्रभेट /परिसर सहल उपक्रमाचे नियोजन संदिप मोरे,अनिल चाचर, रुपाली पिसाळ, पूनम सोनवणे, सोनाली बोन्द्रे, उर्मिला भूतकर, गीतांजली पाटील यांनी केले.
न्हावी शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट द्वारे नवनवीन गोष्टी शिकल्या. क्षेत्रभेट ज्याचा एकच मुख्य उद्देश असतो, भारतीय संस्कृतीचा परिचय, संस्कृतीचे महत्त्व, निसर्गाचा शोध, नवनवीन जीवनशैलीचा अभ्यास, आजूबाजूच्या परिसरातील माहिती, अशा या उपक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शाळेतील चिमुकल्या मुलांनी न्हावी गावातील नवीन गोष्टी शिकल्या.
या चिमुकल्यांना क्षेत्रभेटीसाठी शाळेतील संदीप मोरे सर व अनिल चाचरसर यांनी खूप छान काम केले.
भालचंद्र जगताप, संचालक – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.


