पर्यावरण व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सारोळे शिरवळ निरा नदीकाठी स्वच्छता अभियान.


संपादक : मंगेश पवार

पर्यावरण दिन हा देशासह राज्यात साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिन यांचे औचित्य साधून अबिद इनामदार सरांच्या कल्पनेतून निरानदी परिसर सार्वजनिक स्वच्छतेचा सामाजिक उपक्रम हाती घेऊन आपल्या विधायक कृतीतून समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.त्यासाठी खूप कमी दिवसात त्याचं नियोजन केलं गेलं, कार्यक्रमावर अगोदरच पावसाचे सावट असेल हे माहित होतेच पण तरीही कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

कारण संकट तर खूप येतात त्याची भीती न बाळगता पुढे गेलं तरच काहीतरी निर्माण होतं,

आणि झालय तसंच नियोजनात फक्त एकाच ठिकाणची स्वच्छता करणे हे होतं पण त्या ठिकाणी दोन ठिकाणची स्वच्छता झाली.

 

स्वच्छता कामाची गती एवढी होती की रामेश्वर मंदिराजवळ स्वच्छता तर फक्त १० ते १५ मिनिटातच झाली. त्यानंतर सारोळा निरा नदी परिसरात सर्वांनी स्वच्छता केली.निरा नदी काठच्या परिसरात स्वच्छता अभियानाला सकाळी नऊ वा. पासून बारा वाजेपर्यंत अभियान राबवण्यात आले. यावेळी नदीकाठावरील केरकचरा, प्लास्टिक, काट्या इत्या. परिसरातील घाण काढून निरा नदी परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये नदीकाठचा सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावली.

ADVERTISEMENT

या कार्यक्रमात शिरवळ फॅक्टरी मधून १०० हुन अधिक लोकांनी सहभाग नोंदवला तसेच चिंचवड प्लांट मधून सुद्धा एक टीम यात सहभागी झाली होती. चेतन येवलेकर, सुजाता देशपांडे, सुखदा मॅडम आणि सेंट्रल सेफ्टी टीम यांनीही सहभाग नोंदवला होता.

या कार्यक्रमासाठी सारोळे ग्रामस्थ तरुण मंडळ, थरमॅक्स कंपनी स्टाफ, वर्कर तसेच काही शिक्षक वर्ग यांचा सहभाग होता.

 

घाण, कचऱ्यामुळे अत्यंत अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, प्रदूषण झालेले नदीचे पात्रनिरा नदी स्वच्छता अभियानअंतर्गत स्वच्छ करून तिला गतकालीन महत्त्व प्राप्त करून देण्याचे महत्त्वकांशी अभियान अबिद इनामदार सरांच्या कल्पनेतून आणि सुजान तरुणांच्या, ग्रामस्थ तरुण मंडळ सारोळे यांच्या सहकार्याने सुरू केले आहे. ग्रामस्थांचे सहकार्य लाभावी यासाठी कमी कालावधीमध्ये राजेंद्र मरगजे, सचिन पाटील स्टाफ थरमॅक्स यांनी प्रयत्न केले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!