सायबर पोलीसांच्या सतर्कतेमुळे तक्रार नागरिकाचे १० लाख ४० हजार ४७० रुपये परत! सातारा पोलिसांचे नागरिकांना आव्हान.


संपादक : मंगेश पवार

सातारा :  ऑनलाईन सायबर क्राईम चे वाढते प्रमाण लक्षात घेता सामान्य जनतेची जनजागृती करण्यासाठी तसेच सायबर क्राईम संदर्भात घडणा- या प्रकारांवर वेळेत व परिणामकारक कारवाई करण्याकरीता जिल्हा पोलिसांनी आदेश दिले.

 

सायबर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार हे तक्रारदार यांची तक्रार १९३० या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर रजिस्टर करणेबाबत तात्काळ योग्य ते मार्गदर्शन करतात. तद्नंतर सदरची तक्रार एनसीसीआरपी पोर्टलव्दारे स्वीकारुन पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी संबंधीत पोलीस ठाणेस पाठविली जाते. संबधित पोलीस ठाणे हे सायबर पोलीस ठाणेशी संपर्क करून सायबर पोलीस ठाणे यांचे मार्फतीने पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत बँकेचे नोडल अधिकारी यांना पत्रव्यवहार करून तक्रारदार यांचे पैसे परत मिळविण्याकरीता प्रयत्न करतात.

 

ऑनलाईन फसवणुक झालेल्या तक्रारदार यांचे माहे मे २०२४ मधील अल्प कालावधीत एकुण १० लाख ४० हजार ४७० रुपये होल्ड झाले होते. तक्रारदार यांना त्यांचे मोबाईलवर पैसे होल्ड झाल्याचा मेसेज आल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे पैसे मिळण्यासाठी सायबर पोलीस ठाणे येथे संपर्क केला असता सायबर पोलीस ठाणेकडून तक्रारदार व पोलीस ठाणे अंमलदार यांना योग्य ती माहिती पुरवून त्यांचे होल्ड झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी कराड शहर, खंडाळा, सातारा शहर, फलटण शहर, रहिमतपूर तसेच शाहुपूरी पोलीस ठाणेतील अर्जदारांची बँक व फसवणुक झालेली रक्कम गेलेली बँक यांचेशी खात्री करुन तात्काळ पत्रव्यवहार केला. तसेच तक्रारदार यांनी पैसे परत मिळण्यासाठी मा. न्यायालयाचे आदेश प्राप्त करुन तक्रारदार यांचे १० लाख ४० हजार ४७० रुपये रक्कम अल्प कालावधीत त्याचे बैंक खात्यामध्ये जमा करून देण्यात यश आलेले आहे.

ADVERTISEMENT

 

मा. वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ कारवाई करून संबंधीत बँकेशी व पोलीस ठाणेशी तात्काळ संपर्क साधला. सदर कारवाईमध्ये सायबर पोलीस ठाणेचे अमंलदार माधुरी बाचल, अतुला तावरे, वर्षा खोचे, संदिप पाटील, गौरी कुटे, श्रध्दा माने, सुप्रिया रोमण, तसेच कराड शहर पोलीस ठाणेचे महेश शिंदे, खंडाळा पोलीस ठाणेचे शरद यादव, सातारा शहर पोलीस ठाणेचे स्नेहल कलकुटगी, फलटण शहर पोलीस ठाणेचे कुंभार, रहिमतपूर पोलीस ठाणेचे दिपक देशमुख, शाहुपूरी पोलीस ठाणेचे चव्हाण यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा. आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

 

सातारा पोलिसांचे नागरिकांना आवाहन

सातारा जिल्हा पोलीस दलाचे मा. पोलीस अधिक्षक समीर शेख व मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांचेकडुन तमाम जनतेस आवाहन करण्यात येते की, आपली आर्थिक फसवणुक झाली असलेस आपण आपले मोबाईल फोनव्दारे सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर १९३० या क्रमांकावर घरबसल्या फोन करून आपली तक्रार तात्काळ नोंद करावी. त्यामुळे फसवणुक झालेली रक्कम थांबवण्याकरीता मदत होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!