श्रीकांत खुंटे यांचे वृद्धापकाळाने निधन.
सातारा : श्रीकांत लक्ष्मण खुटे मुळचे राहणार भोळी, ता.खंडाळा, जि. सातारा
वीर धरण प्रकल्पामुळे तरडगाव,या. फलटण, जि. सातारा येथे स्थायिक जन्म १/६/१९५४ , निर्वाण ३/६/२०२४
तरडगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
भोळी येथे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण पूर्ण, सातारा येथे बीकॉम पूर्ण केले.
नोकरीसाठी मुंबई, चेंबूर येथे स्थायिक झाले.
मोठमोठ्या प्रेसचे दुरूस्ती करण्यात प्राविण्य असल्याने लवकरच नोकरी ऐवजी व्यवसाय करू लागले.
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड, खडकी, पुणे येथे मुकादम म्हणून काम करत असलेले शिरवळचे शंकर भैरू कांबळे यांची मुलगी सुरेखा तिचे सोबत त्यांचा विवाह झाला. वाढत्या व्यवसायामुळे ते मुंबईहून नागपूरला स्थायिक झाले.
मुलगा चंद्रशेखर ऊर्फ बाबू व किरण ऊर्फ सोनू हे दोघेही उच्चशिक्षित असून चंद्रशेखर हा मुलगा त्यांचाच व्यवसाय आता सांभाळत आहे व किरण एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करत आहे. त्यांची सून शिल्पा ही गृहिणी आहे व नातू शार्दुल आहे.
त्यांचे बंधू रमाकांत खुटे, भाऊजय अनिता व त्यांची दोन मुले आहेत.
सामाजिक कार्यात व गरजूंना शिक्षणासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्यात ते नेहमीच पुढाकार घेत होते. त्यांचे मेहुणे शिरवळचे महादेव कांबळे यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष सहकार्य केल्यामुळेच महादेव कांबळे यांची मुलगी मृणाल व मुलगा अनुज हे दोघेही डॉक्टर झाले आहेत.