माजी नगरसेवक अनुप शहा यांच्या कार्यालयात वयश्री योजनेचा फॉर्म भरण्यासाठी गर्दी.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन च्या वतीने वय श्री योजना फॉर्म भरण्याचा आयोजित करण्यात आल्या कॅम्पला नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती फलटण शहर भाजपचे अध्यक्ष व माऊली फाउंडेशनचे संस्थापक अनुप शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये सुमारे दीडशे लोकांचे फॉर्म भरण्यात आले असून या योजनेनुसार 65 वर्षावरील नागरिकांना तीन हजार रुपये राज्य शासनाकडून मुख्यमंत्री व वयोश्री योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत योजनेचे फॉर्म भरून देण्याचे सोय केल्याबद्दल नागरिकांनी माऊली फाउंडेशनचे धन्यवाद व्यक्त केले कॅम्प यशस्वी करण्यासाठी संगीता भोसले रसिका भोजने पल्लवी भोजने पुनम मोहिते शितल मोहिते अस्म शेख हिना शेख रूपाली साळुंखे सुनिता कर्वे मनीषा करवा मनीषा नागावकर निकिता हेमा पोद्दार दिगंबर लाळगे प्रतीक लाळगे तजुमल शेख नितीन चांडक यांच्यासह माऊली फाउंडेशन च्या सर्व ट्रस्टी व फलटण शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले