सावरदरेत जलशुद्धीकरणासाठी नवे पाऊल; मा.पोलीस अधिकारी दिलीप साळुंखे व संतोष मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत फिल्टर प्लॉटचे उद्घाटन.


पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

संपादक मंगेश पवार

कार्यकारी संपादक सागर खुडे

दि. 27, सारोळे (भोर): भोर तालुक्यातील सावरदरे गावामध्ये दत्त मंदिरासमोर नव्याने उभारण्यात आलेल्या पाणी शुद्धीकरण योजनेचा (C-15 अंतर्गत ग्रामीण गृह पाणी पुरवठा योजना) उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.मा. पोलीस अधीकारी दिलीप दादासो साळुंखे यांच्या सौजन्याने स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्यात आली. स्वच्छ पाणीपुरवठा आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा हा उपक्रम गावासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे.

 

 

या उद्घाटन सोहळ्यास माजी पोलीस अधिकारी दिलीप दादासो साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत युवा सरपंच गणेश ज्ञानोबा साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश साळुंखे, सत्यवान साळुंखे, यशवंत गणपत साळुंखे, भरत दगडू साळुंखे, निवृत्ती नामदेव साळुंखे, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र बाबुराव साळुंखे, माजी फौजी ज्ञानोबा भिकोबा साळुंखे, जगनाथ सखाराम साळुंखे, अशोक मारुती बागडे, रमेश शिवाजी साळुंखे, नवनाथ महादेव साळुंखे, सुहास किसन साळुंखे, गणेश रामदास साळुंखे, सागर निवृत्ती साळुंखे, अमित मनसिंग साळुंखे, महेश भरत साळुंखे, कैलास सुदाम साळुंखे, सतीश कृष्णा साळुंखे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

ADVERTISEMENT

 

कार्यक्रमात शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त करत गावाच्या विकासाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व सांगितले. “स्वच्छ पाणी ही प्रत्येक व्यक्तीची मूलभूत गरज असून, या उपक्रमामुळे गावकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहील,” असे ते म्हणाले.

 

या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, आणि एकजुटीने उभारलेल्या या उपक्रमासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंच यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले.

 

सावरदरे गावाचा सर्वांगीण विकास हे आमचे प्रथम उद्दिष्ट आहे. गावातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने एकत्रितपणे हा उपक्रम हाती घेतला. दत्त मंदिरासमोरील जागा निवडून तिथे नवीन फिल्टर प्लॉट बसवण्यात आला आहे.या संपूर्ण कामात ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट, आत्मियता आणि सहकार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संतोष मोहिते आणि माजी पोलीस अधिकारी दिलीप साळुंखे यांचे मार्गदर्शन आणि उपस्थितीमुळे या उपक्रमाला अधिक बळ मिळाले.गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल असून, येत्या काळात अशा आणखी विकासात्मक योजना राबवण्याचा आमचा निर्धार आहे. गावकऱ्यांचा विश्वास हीच आमची ताकद आहे.

युवा सरपंच गणेश साळुंखे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!