रयत संघटना, उंडाळकर गटाचा मनोजदादा घोरपडे यांना जाहीर पाठींबा.


कराड प्रतिनिधी : स्वप्नील गायकवाड

 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा देत त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार उंब्रज ता. कराड येथे झालेल्या मेळाव्यात रयत संघटना, उंडाळकर गटाने केला. प्रमुख नेते मंडळी व हजारो कार्यकर्त्यांनी मेळाव्यास उपस्थित राहून मनोजदादा घोरपडे यांच्या उमेदवारीला पाठींबा दर्शविला. उंब्रज येथे रयत संघटनेना, माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर प्रेमींनी मनोजदादा घोरपडे यांना पाठिंबा देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास कोयना सहकारी दूध संघाचे माजी चेअरमन वसंतराव जगदाळे, बाबूराव धोकटे, कोयना संघाचे माजी उपाध्यक्ष संपतराव इंगवले, निवासराव निकम, मोहनराव माने, महेश कुमार जाधव, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहीते, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष जयसिंगराव चव्हाण, रणजीत पाटील सुद्दामराव चव्हाण, आनंदराव थोरात, सुरेशराव पाटील, बाळासो पवार, जगन्नाथ थोरात, विकास निकम, संदीप काटे, प्रवीण कदम, संतोष यादव, बाळासो जाधव, शिवसेनेचे तुषार निकम, तसेच हजारोंच्या संख्येने जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. २५ वर्षे विद्यमान आमदारांकडून रयत संघटनेला भयानक त्रास झाल्याची खदखद उंडाळकर प्रेमींनी यावेळी व्यक्त करून मनोजदादांना निवडून आणणारच असा निर्धार केला.

ADVERTISEMENT


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!